पुणे महापालिका स्वीकृत नियुक्ती: शिवाजीनगरच्या राजकीय सारीपाटावर ‘सर्वच ‘च सरस? अनुभवी चेहऱ्यांच्या गर्दीत कोणाची वर्णी लागणार??

पुणे: पुणे महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्य निवडीचा पेच आता निर्णायक वळणावर आला आहे. पुणे शहर भाजपाने पाठवलेल्या ५१ जणांच्या यादीत शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून ७ एकापेक्षा एक दिग्गज नावांची चर्चा आहे. यामध्ये अनुभवी राजकीय नेते, माजी नगरसेवक आणि आक्रमक कार्यकर्ते रिंगणात असले, तरी काहीनावाभोवती ‘तज्ज्ञ आणि अभ्यासू’ या निकषांमुळे मोठे वलय निर्माण झाले आहे.

राजकीय अनुभवाचा आणि तज्ज्ञ प्रतिमेचा सुवर्णमध्य
शिवाजीनगर मतदारसंघात संजय मयेकर, रवींद्र साळेगावकर, योगेश बाचल, डॉ.अजय दुधाने, संदीप काळे , सतीश बहीरट,अॅड.सागर सातपुते यांसारख्या निष्ठावान पदाधिकाऱ्यांची मोठी फौज आहे. तसेच आता झालेल्या मनपा निवडणुकीत पराभूत माजी नगरसेविका रेश्मा भोंसले, आदित्य माळवे आणि कोथरूड मतदार सांघातिल पराभूत उमेदवार सुशील मेंगडे यांसारखे अनुभवी चेहरेही शर्यतीत आहेत. मात्र, स्वीकृत सदस्य निवडीचा मूळ उद्देश हा ‘विविध क्षेत्रातील तज्ज्ञांना महापालिकेत स्थान देणे’ हा असतो. या निकषावर पत्रकारिचा दीर्घ अनुभव असलेले संजय मायेकर, गेली २० वर्ष सामाजिक कार्यात असलेले डॉ. अजय दुधाने , पक्षाच्या माध्यमातुन काम करणारे रविंद्र साळेगावकर, व वृक्ष समिती चे माजी सदस्यांचे पारडे जड असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

गुन्हेगार, घराणेशाही की कार्यकर्त्याचा सन्मान? पक्षासमोर मोठे आव्हान
शिवाजीनगरमध्ये गुन्हेगार, घराणेशाही किंवा पुन्हा पुन्हा त्याच चेहऱ्यांना संधी देण्यावरून कार्यकर्त्यांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. अशा वेळी सुशिक्षित आणि मूळ कार्यकर्त्याला संधी दिल्यास, सामान्य कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण होऊ शकते.

खासदार मुरलीधर मोहोळ, महापौर मंजूषा नागपुरे, शहराध्यक्ष धीरज घाटे , आमदार सिद्धार्थ शिरोळे,सभागृह नेते गणेश बीडकर,आणि स्थानिक नेतृत्वासमोर आता एक आव्हान आहे एकीकड़े “महापालिकेच्या कामकाजात तांत्रिक आणि सामाजिक विषयांवर सखोल ज्ञान असणाऱ्या व्यक्तींची गरज आहे.
आता या चुरशीच्या शर्यतीत नव्या/ जुन्या अनुभवी खेळाडूंना संधी मिळते आणि कोण बाजी मारतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

महाराष्ट्र रिपोर्टर बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button