आत्मनिर्भर भारतासाठी तंत्रज्ञान, नवकल्पना आणि लोकसहभाग महत्त्वाचा

केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री डॉ. राज भूषण चौधरी यांचे प्रतिपादन; हिंजवडीत ‘एडब्ल्यूटीआयएस २०२६’ परिषदेचा समारोप

हिंजवडी (पुणे) : आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी तंत्रज्ञान, नवकल्पना आणि लोकसहभाग महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री डॉ. राज भूषण चौधरी यांनी केले.

हिंजवडी येथे आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीजच्या वतीने आयोजित तीन दिवसीय ‘एडब्ल्यूटीआयएस २०२६’ राष्ट्रीय तंत्रज्ञान आणि नवकल्पना परिषदेचा समारोप झाला. यावेळी ते बोलत होते. कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ तंत्रज्ञान आणि हरित ऊर्जेचा प्रभावी वापर देशाच्या विकासासाठी महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच आधुनिक तंत्रज्ञान आणि पाण्याच्या योग्य नियोजनातून जलसुरक्षेचे आव्हान सोडवता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

इस्रोचे संचालक डॉ. एस. व्यंकटेश्वरा शर्मा यांनी अंतराळातील कचऱ्याच्या समस्येवर प्रकाश टाकला. परिषदेत सायबर सुरक्षा, संरक्षण तंत्रज्ञान आणि संशोधनातील नवकल्पनांवर तज्ज्ञांनी विचारमंथन केले.

यावेळी आर्यन्स ग्रुपचे अध्यक्ष मुकुंद जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोहर जगताप, सहकार्यकारी अध्यक्ष स्मिता शितोळे-जगताप, इस्रोचे संचालक डॉ. एस. व्यंकटेश्वरा शर्मा आणि सायबर सुरक्षा तज्ज्ञ मिलिंद पटनायक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्र रिपोर्टर बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button