
मुंबई, १२ मार्च २०२६: कार्यस्थळावरील सुरक्षितता आणि कार्यक्षमतेबाबतची आपली बांधिलकी अधोरेखित करत हायकल लिमिटेडने ४ ते ११ मार्च २०२६ दरम्यान आपल्या सर्व केंद्रांमध्ये कॉर्पोरेट सेफ्टी वीक २०२६ साजरा केला. “From Responsibility to Ownership – Engage, Educate, Empower People to Enhance Safety” या थीमअंतर्गत राबविण्यात आलेल्या या उपक्रमांद्वारे कर्मचारी सहभाग वाढवणे, डिजिटल सुरक्षा प्रणाली अधिक सक्षम करणे आणि संस्थेमध्ये सुरक्षिततेबाबत मालकीची भावना निर्माण करणे यावर भर देण्यात आला.
हायकलमध्ये सुरक्षिततेकडे केवळ नियमांचे पालन म्हणून नव्हे, तर संस्थेच्या कार्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग म्हणून पाहिले जाते. सेफ्टी वीकची सुरुवात लीडरशिप किक-ऑफ कार्यक्रमाने झाली, ज्यामध्ये सुरक्षितता संस्कृती परिवर्तनासाठीच्या पाच तत्त्वांवर विशेष भर देण्यात आला. वरिष्ठ नेतृत्वाने एकत्रित व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मद्वारे विविध केंद्रांवरील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर विविध ठिकाणी उद्घाटन कार्यक्रम, सेफ्टी प्रतिज्ञा समारंभ, सेफ्टी ध्वजवंदन व दीपप्रज्वलन, तसेच नेतृत्व सुरक्षा बांधिलकी फलकांचे अनावरण करण्यात आले. या माध्यमातून सुरक्षिततेबाबत नेतृत्वाची स्पष्ट आणि दृश्यमान बांधिलकी अधोरेखित झाली.
सेफ्टी वीक २०२६ दरम्यान हायकलच्या SunBPM डिजिटल सेफ्टी गव्हर्नन्स प्लॅटफॉर्मला अधिक बळकटी देण्यावर विशेष भर देण्यात आला. इन्सिडेंट लर्निंग आणि सिस्टीम प्रशिक्षण सत्रांद्वारे कर्मचाऱ्यांना अपघात टळलेल्या घटना (near miss), असुरक्षित कृती आणि असुरक्षित परिस्थिती यांची नोंद कशी करावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले, तसेच मंजुरी प्रक्रिया आणि जबाबदाऱ्यांची माहिती देण्यात आली. “See it. Own it. Fix it.” या संकल्पनेवर आधारित या उपक्रमाद्वारे प्रतिक्रियात्मक उपाययोजनांऐवजी सक्रिय प्रतिबंधात्मक दृष्टीकोन विकसित करण्यावर भर देण्यात आला.
याशिवाय नेतृत्व गेंबा फेऱ्या आणि बहुविभागीय सुरक्षा तपासण्या यांद्वारे उत्पादन युनिटमध्ये संभाव्य धोके ओळखणे व त्यांची नोंद SunBPM प्रणालीमध्ये करणे यावर भर देण्यात आला. यामुळे त्वरित सुधारात्मक उपाययोजना राबविणे शक्य झाले आणि जबाबदारीची भावना अधिक दृढ झाली.
कार्यस्थळावरील शिस्त आणि धोका प्रतिबंध यासाठी सर्व केंद्रांवर “चकाचक – क्लीन साइट, सेफ साइट” स्पर्धा, तसेच 5S मूल्यांकन आणि दृश्य सुरक्षा आढावे आयोजित करण्यात आले. या उपक्रमांमुळे स्वच्छता, सुव्यवस्था आणि सुरक्षित कार्यपद्धतींना चालना मिळाली.
कर्मचारी सहभाग वाढविण्यासाठी सुरक्षा प्रश्नमंजुषा, धोका शोध स्पर्धा, पीपीई (वैयक्तिक संरक्षण साधने) जनजागृती कार्यक्रम आणि प्रात्यक्षिक सराव (मॉक ड्रिल्स) आयोजित करण्यात आले. तसेच “Safety & Family” या विशेष सत्राद्वारे कर्मचाऱ्यांना “Why We Go Home Safe” या संकल्पनेच्या माध्यमातून सुरक्षिततेमागील भावनिक पैलूंवर विचार करण्यास प्रोत्साहित करण्यात आले. कर्मचाऱ्यांना “I work safely because…” या वाक्याने सुरू होणारी वैयक्तिक बांधिलकी व्यक्त करण्यासाठीही आमंत्रित करण्यात आले, ज्यामुळे नियमपालनापासून सुरक्षिततेची वैयक्तिक जबाबदारी स्वीकारण्यापर्यंतचा दृष्टिकोन अधिक बळकट झाला.
या उपक्रमाचा समारोप सर्व केंद्रांवरील समारोप समारंभांद्वारे झाला. या वेळी सेफ्टी चॅम्पियन्सचा सन्मान करण्यात आला आणि पुढील वर्षासाठीची सुरक्षा उद्दिष्टे जाहीर करण्यात आली. तसेच कॉर्पोरेट पर्यावरण, आरोग्य व सुरक्षा विभागाकडे (Corporate EHS) एकत्रित सेफ्टी वीक अहवाल सादर करून संस्थेमध्ये सातत्यपूर्ण सुधारणा आणि ज्ञानविनिमयाला चालना दिली जाणार आहे.
या उपक्रमाबद्दल बोलताना रतीश झा, प्रेसिडेंट – एच आर, हायकल लिमिटेड, म्हणाले:
“सुरक्षिततेतील परिवर्तनासाठी केवळ धोरणे आणि प्रक्रिया पुरेशा नसतात — त्यासाठी मालकीची भावना आवश्यक असते. या मोहिमेद्वारे आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना योग्य प्रणाली, नेतृत्वाचा पाठिंबा आणि भावनिक जोड देत आहोत, ज्यामुळे सुरक्षितता ही प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी बनते. आमचे उद्दिष्ट असे वातावरण निर्माण करणे आहे जिथे प्रत्येक कर्मचारी केवळ स्वतःच्या सुरक्षिततेसाठीच नव्हे तर आपल्या सहकाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठीही जबाबदार असल्याची भावना बाळगतो.”
नेतृत्वाची दृश्यमानता, डिजिटल सक्षमीकरण, कर्मचारी सहभाग आणि भावनिक बांधिलकी यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हायकल जीवन-विज्ञान क्षेत्रामध्ये सक्रिय सुरक्षा उत्कृष्टतेचा मजबूत मानदंड निर्माण करत आहे.
हायकल लिमिटेड बद्दल
१९८८ मध्ये स्थापन झालेली हायकल ही Pharmaceutical, Animal Health, Biotech, Crop Protection आणि Specialty Chemical उद्योगांसाठी विश्वासार्ह भागीदार आहे. कंपनी जागतिक जीवन-विज्ञान उद्योगासाठी Active Ingredients, Intermediates आणि Biocides चे उत्पादन व पुरवठा करते. महाराष्ट्र (तळोजा व महाड), गुजरात (पनोली) आणि बेंगळुरू (जिगणी) येथे कंपनीची उत्पादन केंद्रे असून पुण्यात अत्याधुनिक Research & Technology Centre आहे. कंपनीच्या उत्पादन केंद्रांची जागतिक नियामक संस्थांकडून तपासणी व मान्यता मिळाली आहे. जीवन-विज्ञान मूल्यसाखळीतील भागीदार व ग्राहकांसाठी टिकाऊ उपाय विकसित करणे हे हायकलचे ध्येय आहे. समावेशक विकासावर विश्वास ठेवत कंपनी सर्व घटकांसोबत प्रगती साधते. Responsible Care® प्रमाणपत्र प्राप्त करणाऱ्या पहिल्या भारतीय जीवन-विज्ञान कंपन्यांपैकी हायकल एक आहे. उत्पादन प्रक्रियेत सर्वोत्तम पद्धती अवलंबून कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देते.
