
पुणे, दि. 20 मार्च — सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील शिक्षणशास्त्र प्रशाळा, शिक्षणशास्त्र व विस्तार विभाग यांच्या वतीने डॉ. दत्तात्रेय तापकीर लिखित “भारतीय ज्ञान प्रणाली – माहिती आणि महती” या पुस्तकाचे प्रकाशन समारंभ उत्साहात पार पडला. सदर पुस्तकाचे प्रकाशन सुविचार प्रकाशन यांच्या माध्यमातून करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी मा. कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी तसेच मा. प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात शिक्षणशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा. डॉ. विलास आढाव, आंतरविद्या अभ्यास शाखेचे अधिष्ठाता डॉ. संजय तांबट, शिक्षणशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. गीता शिंदे तसेच डॉ. अर्चना सुरेश गोसावी यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
या निमित्ताने मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. सुविचार प्रकाशनाच्या श्रीमती बनहट्टी यांनी प्रकाशनाची भूमिका स्पष्ट केली. लेखक डॉ. दत्तात्रेय तापकीर यांनी आपल्या मनोगतात या पुस्तकाच्या लेखनाचा उद्देश, भारतीय ज्ञान प्रणालीचे महत्त्व तसेच हे पुस्तक विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि समाजासाठी कसे उपयुक्त ठरेल याबद्दल सविस्तर विवेचन केले.
कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन शिक्षणशास्त्र विस्तार विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. गीता शिंदे यांनी केले, तर अध्यक्षीय समारोप प्रा. डॉ. विलास आढाव यांनी केला.
या कार्यक्रमास ज्येष्ठ शिक्षक डॉ. नानकर, डॉ. निर्मला तापकीर, डॉ. पौर्णिमा कदम, डॉ. गायत्री चौकडे, डॉ. निशा वळवी, डॉ. सारिका तोरवणे, हेमलता पाटील, प्राप्ती देवकाते तसेच विभागातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
