आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ या चित्रपटाची सर्वत्र क्रेझ पहायला मिळतेय. 2025 या वर्षातील हा यशस्वी चित्रपटांपैकी एक ठरला आहे. एकीकडे हा चित्रपट, त्यातील कलाकार आणि त्यांच्या दमदार अभिनयाचं प्रेक्षकांकडून कौतुक होत असतानाच काहीजण त्यातील हिंसक दृश्यांवर टीकासुद्धा करत आहेत. प्रमाणापेक्षा अधिक हिंसा, रक्तपात यात दाखवल्याने अनेकांनी चित्रपटाचा विरोध केला आहे. आता या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेले अभिनेते राकेश बेदी यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत राकेश बेदी म्हणाले, “रामाने रावणाला कोणत्याही हिंसेशिवाय मारलं होतं का? आता जर एक खलनायक जो अत्यंत खतरनाक आहे, ज्याला लोक प्रचंड घाबरतात, तर मग साहजिकच दोन्ही बाजूंनी हिंसा होणारच ना?”
‘धुरंधर’मधील रक्तपाताच्या, हिंसेच्या दृश्यांवर अभिनेता स्पष्टच म्हणाला, रामाने रावणाला.
