साईबालाजी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स आयोजित VISTA 2K26 दुअथलॉन व मॅरेथॉन स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे, २२ फेब्रुवारी २०२६ — साईबालाजी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या VISTA 2K26 – द ऑलिम्पिक डिस्टन्स डुअथलॉन व मॅरेथॉन स्पर्धेमध्ये तब्बल १००० हून अधिक स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आयआयएमएस पुणे आणि मेझ्झा ९, हिंजवडी येथे पहाटे ६:३० वाजल्यापासून सुरू झालेल्या या भव्य क्रीडा महोत्सवाने मोठे यश संपादन केले.

महाविद्यालयीन फेस्टमध्ये आयोजित करण्यात आलेली ही एकमेव ऑलिम्पिक डिस्टन्स डुअथलॉन स्पर्धा ठरली. स्पर्धेत ५ किमी धावणे, ४० किमी सायकलिंग आणि १० किमी धावणे अशा आव्हानात्मक टप्प्यांचा समावेश होता. याशिवाय ५ किमी व १० किमी मॅरेथॉन आणि साईबालाजी पब्लिक स्कूलच्या सहकार्याने १.५ किमी “फन रन “चेही आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेमध्ये अत्याधुनिक आरएफआयडी ट्रॅकिंग प्रणालीचा वापर करण्यात आला होता. प्रत्येक स्पर्धकाच्या बिबवर आरएफआयडी चिप बसविण्यात आली होती, ज्यामुळे धावपटूंची सुरुवात, प्रत्येक टप्प्यावरील वेळ आणि अंतिम वेळ अचूकपणे नोंदवली गेली. या तंत्रज्ञानामुळे मानवी चुका टळल्या तसेच निकाल प्रक्रिया जलद आणि पारदर्शक झाली. सहभागी स्पर्धकांना अधिकृत बिब टाइम सर्टिफिकेट देण्यात आले, ज्यामुळे त्यांना त्यांच्या कामगिरीचा अचूक डेटा मिळाला. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे संपूर्ण स्पर्धेचे व्यवस्थापन अधिक शिस्तबद्ध आणि व्यावसायिक पद्धतीने पार पडले.

विद्यार्थी, व्यावसायिक खेळाडू, आयटी क्षेत्रातील कर्मचारी आणि फिटनेसप्रेमी नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदविला. विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिके देण्यात आली.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश युवकांमध्ये फिटनेस, शिस्त, सहनशक्ती आणि समुदाय सहभागाची भावना निर्माण करणे हा होता. संपूर्ण कार्यक्रम यशस्वीपणे पार पडल्याबद्दल आयोजकांनी सर्व सहभागी, स्वयंसेवक आणि सहकार्य करणाऱ्या संस्थांचे आभार मानले.

प्रा.मनीष मुंदडा, संस्थापक अध्यक्ष, साई बालाजी एजुकेशन सोसायटी यांनी सांगितले की, डुअथलॉन हा केवळ क्रीडा उपक्रम नसून युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी एक प्रेरणादायी व्यासपीठ आहे. भविष्यातही अशा उपक्रमांद्वारे समाजात आरोग्य व फिटनेसविषयी जागरूकता निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न राहील.यावेळी संस्थेच्या सचिव प्रा.निरूपमा मुंदडा यांनी विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन करून आयोजकांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.

डुअथलॉनच्या भव्य यशामुळे साईबालाजी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सने पुन्हा एकदा आपली उत्कृष्ट आयोजन क्षमता सिद्ध केली आहे.या स्पर्धेमुळे पुणे शहरातील क्रीडा संस्कृतीला नवी उभारी मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली

डुअथलॉन विजेते (पुरुष)
१) सपान पांचाळ
२) ईश्वर पाटील
३) क्षेतमयूम कबिदाश

डुअथलॉन विजेते (महिला)
१) ऐश्वर्या दुधाडे
२) साक्षी पांडे
३) किरणाक्षी राजपूत

महाराष्ट्र रिपोर्टर बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button