Medicover Hospitals मध्ये जटिल ‘रोटाट्रिप्सी’ प्रक्रियेमुळे ज्येष्ठ रुग्णाला नवे आयुष्य

पुणे: Medicover Hospitals येथे अत्याधुनिक हृदयरोग उपचार पद्धतींचा प्रभावी वापर करत ७३ वर्षीय हनुमंत खंडागळे यांना जटिल ‘रोटाट्रिप्सी’ प्रक्रियेच्या मदतीने यशस्वीरित्या उपचार देण्यात आले. ही प्रक्रिया प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. सुरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

रुग्णाला मागील १५ दिवसांपासून श्रम करताना छातीत वेदना व श्वास लागणे अशा तक्रारी होत्या. तपासणीनंतर हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या दोन मुख्य धमन्यांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक अडथळा (ब्लॉकेज) असल्याचे निदान झाले.

धमन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कॅल्शियम साचल्यामुळे आणि आजाराची गुंतागुंत लक्षात घेता सुरुवातीला कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्टिंग (CABG) शस्त्रक्रियेचा सल्ला देण्यात आला. मात्र, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी ओपन-हार्ट सर्जरीस नकार दिल्याने डॉक्टरांनी पर्यायी उपचार पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला.

यानुसार, ‘रोटा अब्लेशन’ आणि ‘इंट्राव्हॅस्क्युलर लिथोट्रिप्सी’ या दोन तंत्रांचा एकत्रित वापर करून ‘रोटाट्रिप्सी’ ही जटिल अँजिओप्लास्टी करण्यात आली. कॅल्शियमयुक्त कडक ब्लॉकेज दूर करण्यासाठी ही अत्याधुनिक पद्धत विशेषतः उपयुक्त मानली जाते.

ही प्रक्रिया अत्यंत आव्हानात्मक होती. धमन्यांमधील अडथळा इतका गंभीर होता की, अगदी बारीक वायर (0.014”) टाकल्यानंतरही रक्तप्रवाह तात्पुरता बंद झाला आणि रुग्णाला छातीत वेदना जाणवू लागल्या. मात्र, डॉक्टरांच्या कौशल्यपूर्ण प्रयत्नांमुळे दोन्ही धमन्यांमधील अडथळे यशस्वीरित्या दूर करण्यात आले.

उपचारानंतर रुग्णाची प्रकृती समाधानकारक राहिली असून त्यांना चांगल्या प्रकृतीत रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.

“हा अत्यंत गुंतागुंतीचा आणि धोकादायक केस होता, परंतु योग्य तंत्रज्ञान आणि अनुभवाच्या जोरावर आम्ही यश मिळवले,” असे डॉ. पाटील यांनी सांगितले.

रुग्णाला आता “नवे आयुष्य” लाभले असून ते आनंदाने घरी परतले आहेत.

महाराष्ट्र रिपोर्टर बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button