गुणवरे येथे क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त बुद्धभूषण अरविंद आढाव, तथागत चॅरिटेबल ट्रस्ट (गुणवरे) आणि समस्त ग्रामस्थ गुणवरे यांच्या वतीने भव्य मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

गुणवरे (प्रतिनिधी):
क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून, गुणवरे येथे ‘मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे’ भव्य आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित केलेले हे शिबीर मंगळवार, १४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत पार पडणार आहे.
शिबिराची प्रमुख वैशिष्ट्ये:
या शिबिरामध्ये रुग्णांना अत्युच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा मोफत पुरवल्या जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने:

  • मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया.
  • बिनटाक्याची शस्त्रक्रिया (मोफत लेन्ससह).
  • तपासणीनंतर चष्म्याचा नंबर काढून अल्प दरात चष्मे उपलब्ध करून दिले जातील.
  • शस्त्रक्रिया होणाऱ्या रुग्णांसाठी मोफत प्रवास, निवास आणि भोजनाची उत्तम सोय करण्यात आली आहे. (शस्त्रक्रिया एच.व्ही. देसाई नेत्र रुग्णालय हडपसर,पुणे येथे होतील)
    मार्गदर्शन व सहकार्य:
    हे शिबीर एच.व्ही. देसाई नेत्र रुग्णालय (हडपसर), साक्षी ऑप्टिकल्स, फलटण आणि डॉ. सोनाली बुद्धभूषण आढाव यांच्या विशेष सहकार्यातून व मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहे.
    कार्यक्रमाचा तपशील:
  • दिनांक: मंगळवार, १४ एप्रिल २०२६
  • वेळ: सकाळी ०९:०० ते दुपारी ०२:०० वाजेपर्यंत.
  • स्थळ: भैरवनाथ वि.वि. कार्यकारी सह. सेवा संस्था, गुणवरे.
    आयोजक:
    या उपक्रमाचे आयोजन बुद्धभूषण अरविंद आढाव, तथागत चॅरिटेबल ट्रस्ट (गुणवरे) आणि समस्त ग्रामस्थ गुणवरे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
    “गुणवरे व पंचक्रोशी तील गरजू घटकांना दृष्टी मिळावी या उदात्त हेतूने हे शिबीर आयोजित केले आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
महाराष्ट्र रिपोर्टर बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button