Savitribai Phule Pune University, पुणेसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये मागील १७ वर्षांपासून DAPSA (डॉ. बाबासाहेब आंबेडकर पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट्स असोसिएशन) या संघटनेमार्फत “१८ तास अभ्यास अभियान” सातत्याने राबविण्यात येत आहे.

Mahatma Jyotiba Phule आणि Dr. Babasaheb Ambedkar यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी हा उपक्रम आयोजित केला जातो.
या उपक्रमाची संकल्पना DAPSA चे अध्यक्ष Amol Sarvade यांची असून Sagar Sonkambale यांच्या मार्गदर्शनाखाली हे १८ तास अभ्यास अभियान यंदाही उत्साहात पार पडले. उद्घाटन प्रसंगी अमोल सरवदे यांनी प्रस्ताविकेत सांगितले की, फुले-शाहू-आंबेडकर यांचा विचार महाराष्ट्रभर पोहोचवण्याचे कार्य संघटना सातत्याने करत राहील. तसेच या अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा खरा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमादरम्यान सागर सोनकांबळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “विद्यार्थी ही देशाची खरी शक्ती आहे. विद्यार्थी घडवणे म्हणजे देश घडवणे होय. फुले-शाहू-आंबेडकर यांचा विचार प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम आमची संघटना करत आहे.”
सदर १८ तास अभ्यास अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू मा. Dr. Suresh Gosavi, डॉ. पराग काळकर, मा. प्रभारी कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, आंतरराष्ट्रीय केंद्राचे प्रमुख प्रा. डॉ. विजय खरे, संचालक शिक्षणशास्त्र प्रशाला प्रा. डॉ. विलास आढाव, प्रा. डॉ. सदानंद भोसले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख डॉ. सुधाकर बोकेफोडे, डॉ. संजय कोळेकर, प्रा. डॉ. गीता शिंदे, ॲड. क्रांती सहाने आदी मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी डॉ. गणेश भामे, एन.एस.यु.आय महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अक्षय कांबळे, विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष राहुल ससाणे, रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुरज गायकवाड तसेच विविध विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे अध्यक्ष अमोल सरवदे यांनी केले, तर सूत्रसंचालन कार्याध्यक्ष सागर सोनकांबळे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. मोहन कांबळे, डॉ. सुनील गायकवाड, डॉ. अनिल पवळ, निखिल सिद्धगणेश, अक्षय कांबळे, सुरज गायकवाड, प्रा. राहुल रुही, राहुल ससाणे, डॉ. जयकर गायकवाड, दगडू सोनकांबळे, समाधान दुपारगुडे, ॲड. आम्रपाली धिवार, ॲड. विवेक शाक्य, तुकाराम शिंदे, प्रज्योत गायकवाड, गीता सगरे, चंद्रकांत दुर्गे, उषा कांबळे, किरण भद्रे, रोहित बनसोडे, सिद्धांत जांभुळकर, डॉ. प्रज्ञानंद जांधळे, जयश्री कांबळे, मयुर जावळे, डॉ. सूर्यकांत गायकवाड, प्रशांत शिंदे, राजेंद्र नेमाने, समाधान सरवदे, लक्ष्मी कांबळे, मसाजी गायकवाड, गणेश मोरे, सुशांत धसाडे, भगवान वाघमारे, मिलिंद वाघमारे, ओंकार बिनवडे, अभिषेक शेलकर, अभिजीत जाधव, अरुण जाधव, दिपक सुतार, अशोक गोरे, गंगाधर मामिलवार, गणेश गायकवाड, साहेबराव क्षीरसागर, विनोद वाघमारे, बसवराज सोनकांबळे, सुरज चव्हाण आदींनी परिश्रम घेतले.

महाराष्ट्र रिपोर्टर बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button