
हायवे इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने (BSE: 544477 | NSE: HILINFRA) एकाच दिवशी तब्बल ६३०.१७ कोटी रुपयांच्या तीन महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या अंमलबजावणीच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. कंपनीने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासोबत (NHAI) तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशातील दोन टोल वसुली प्रकल्पांसाठी करार केले असून, मध्य प्रदेशातील प्रकल्पासाठी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (CPWD) काम सुरू करण्याचे पत्र प्राप्त झाले आहे.
या तीन प्रकल्पांमध्ये तामिळनाडूतील ३४०.०८ कोटी रुपयांचा पालायम फी प्लाझा प्रकल्प सर्वांत मोठा आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील कृष्णगिरी-थुम्बीपाडी विभागात टोल व्यवस्थापन आणि शुल्क संकलनाची जबाबदारी कंपनीकडे असेल. या प्रकल्पाचे कामकाज २४ नोव्हेंबर २०२६ पासून एक वर्षासाठी सुरू होणार आहे.
उत्तर प्रदेशातील ९१.७८ कोटी रुपयांच्या बैती कला फी प्लाझा प्रकल्पासाठीही कंपनीने NHAI सोबत करार केला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५६ (नवीन NH-731) वरील सुलतानपूर-वाराणसी मार्गावर टोल वसुलीसह लगतच्या स्वच्छतागृह सुविधांची देखभाल केली जाणार आहे. या प्रकल्पाची सुरुवात ३० डिसेंबर २०२६ पासून होणार असून, त्याचा कालावधी एक वर्षाचा आहे.उत्तर प्रदेशातील ९१.७८ कोटी रुपयांच्या बैती कला फी प्लाझा प्रकल्पासाठीही कंपनीने NHAI सोबत करार केला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५६ (नवीन NH-731) वरील सुलतानपूर-वाराणसी मार्गावर टोल वसुलीसह लगतच्या स्वच्छतागृह सुविधांची देखभाल केली जाणार आहे. या प्रकल्पाची सुरुवात ३० डिसेंबर २०२६ पासून होणार असून, त्याचा कालावधी एक वर्षाचा आहे.
दरम्यान, मध्य प्रदेशातील सिहोर येथे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) १२ व्या रिझर्व्ह बटालियनसाठी निवासी व अनिवासी पायाभूत सुविधांचे नियोजन, डिझाइन आणि बांधकाम करण्यासाठी कंपनीला CPWD कडून १९८.३१ कोटी रुपयांचे काम सुरू करण्याचे पत्र मिळाले आहे. EPC Mode-I अंतर्गत हा प्रकल्प दोन वर्षांत पूर्ण करण्यात येणार आहे.
NHAI चे दोन्ही टोलवसुली प्रकल्प एकूण ४३१.८६ कोटी रुपयांचे असून, त्यामुळे कंपनीच्या टोल संकलन व्यवसायाला मोठी चालना मिळणार आहे. तर CPWD च्या प्रकल्पामुळे कंपनीच्या EPC पायाभूत सुविधा व्यवसायाचा विस्तार होणार आहे.याबाबत बोलताना कंपनीचे पूर्णवेळ संचालक आणि मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) अनूप अग्रवाल म्हणाले की, एकाच दिवशी तीन प्रकल्पांच्या अंमलबजावणीच्या दिशेने झालेली प्रगती हा कंपनीसाठी महत्त्वपूर्ण टप्पा आहे. NHAI सोबतचे करार आणि CPWD कडून मिळालेले काम सुरू करण्याचे पत्र यामुळे प्रकल्प प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या टप्प्यावर पोहोचण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. वेळेत काम पूर्ण करणे, कार्यात्मक क्षमता वाढवणे आणि भागधारकांसाठी दीर्घकालीन मूल्य निर्माण करणे यावर कंपनीचा भर राहणार आहे.
तीन दशकांहून अधिक अनुभव असलेली हायवे इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड टोल संकलन, EPC पायाभूत सुविधा आणि रिअल इस्टेट विकास या क्षेत्रांत कार्यरत आहे. नव्या प्रकल्पांमुळे कंपनीची तीन राज्यांतील उपस्थिती अधिक मजबूत होणार असून, सरकारी पायाभूत सुविधा क्षेत्रातील विस्ताराला नवी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
