मेडिकव्हर हॉस्पिटल, भोसरी येथे नेफ्रोलॉजी आणि युरोलॉजी विभागाचा 1000 हून अधिक यशस्वी शस्त्रक्रिया व उपचारांचा टप्पा पूर्ण

रुग्ण सत्कार सोहळ्यात तज्ज्ञ डॉक्टरांचा गौरव; उत्कृष्ट आरोग्यसेवेचा महत्त्वपूर्ण टप्पा साजरा

पुणे, 24 जुलै 2026 : मेडिकव्हर हॉस्पिटल, भोसरी-पुणे येथील नेफ्रोलॉजी आणि युरोलॉजी विभागाने 1000 हून अधिक यशस्वी उपचार व शस्त्रक्रियांचा मैलाचा दगड गाठला आहे. या उल्लेखनीय यशानिमित्त हॉस्पिटलच्या सभागृहात यशोत्सव व रुग्ण सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाला ऑल पीसीएमसी सिनियर सिटिझन्स असोसिएशनचे सचिव श्री. आनंद साखोरे आणि सीजीएचएस समितीचे सदस्य श्री. रामकृष्ण ठाकूर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी मेडिकव्हर हॉस्पिटलचे सल्लागार नेफ्रोलॉजिस्ट डॉ. पवन वाखरे आणि सल्लागार युरोलॉजिस्ट डॉ. सुमित चौधरी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या नेतृत्वाखालील वैद्यकीय पथकाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मूत्रपिंड व मूत्रविकारांवरील अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया आणि उपचार यशस्वीपणे पूर्ण केले आहेत.

या प्रसंगी रुग्णांचा सत्कार करण्यात आला. उपचारानंतर निरोगी आयुष्य जगत असलेल्या रुग्णांनी आपल्या अनुभवांची मांडणी करत मेडिकव्हर हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांचे, परिचारिका व संपूर्ण आरोग्यसेवा पथकाचे आभार मानले.

यावेळी सल्लागार नेफ्रोलॉजिस्ट डॉ. पवन वाखरे म्हणाले, “1000 हून अधिक यशस्वी नेफ्रोलॉजी आणि युरोलॉजी उपचार व शस्त्रक्रियांचा टप्पा गाठणे ही आमच्या संपूर्ण वैद्यकीय पथकासाठी अभिमानाची बाब आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान, अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर आणि रुग्णकेंद्रित उपचारपद्धती यांच्या बळावर आम्ही अनेक गुंतागुंतीच्या किडनी विकारांवर यशस्वी उपचार करू शकलो आहोत. भविष्यातही प्रत्येक रुग्णाला जागतिक दर्जाची, सुरक्षित आणि परिणामकारक आरोग्यसेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

सल्लागार युरोलॉजिस्ट डॉ. सुमित चौधरी म्हणाले, “युरोलॉजी क्षेत्रात अत्याधुनिक एंडोस्कोपिक, लेझर आणि मिनिमली इन्व्हेसिव्ह शस्त्रक्रियांमुळे रुग्णांना अधिक सुरक्षित, कमी वेदनादायक आणि जलद बरे होणारे उपचार देणे शक्य झाले आहे. 1000 हून अधिक यशस्वी उपचारांचा हा टप्पा आमच्या रुग्णांनी आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे. आगामी काळातही आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अधिकाधिक रुग्णांना उत्कृष्ट आरोग्यसेवा देण्याचा आमचा प्रयत्न कायम राहील.”

यावेळी उपस्थित मान्यवरांनी मेडिकव्हर हॉस्पिटलच्या नेफ्रोलॉजी व युरोलॉजी विभागाने अल्पावधीत गाठलेल्या या यशाबद्दल कौतुक व्यक्त केले. त्यांनी गुणवत्तापूर्ण, रुग्णकेंद्रित आणि आधुनिक आरोग्यसेवा देण्याच्या हॉस्पिटलच्या वचनबद्धतेचे विशेष अभिनंदन केले.

1000 हून अधिक यशस्वी उपचार आणि शस्त्रक्रियांचा हा टप्पा मेडिकव्हर हॉस्पिटलच्या तज्ज्ञ वैद्यकीय सेवा, अत्याधुनिक सुविधा आणि अनुभवी डॉक्टरांच्या समर्पित कार्याचा ठोस पुरावा असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. हॉस्पिटलने भविष्यातही रुग्णांना जागतिक दर्जाची आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा निर्धार व्यक्त केला.

महाराष्ट्र रिपोर्टर बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button