शिवाजीनगर न्यायालयात भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्नजिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे व डिवाईन जैन ग्रुप ट्रस्ट™चा संयुक्त उपक्रम; ३०० हून अधिक जणांनी घेतला लाभ

पुणे (प्रतिनिधी) : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे व डिवाईन जैन ग्रुप ट्रस्ट™ यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय, पुणे यांच्या सहकार्याने अशोका हॉल, जिल्हा न्यायालय, शिवाजीनगर येथे भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला न्यायाधीश, न्यायालयीन कर्मचारी, कोर्ट पोलीस कर्मचारी, अधिवक्ता तसेच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


मा. श्रीमती अंजू एस. शेंडे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर संपन्न झाले. शिबिरात ३०० हून अधिक नागरिकांनी मोफत नेत्र तपासणीचा लाभ घेतला.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून श्री. राजेश शहा, अध्यक्ष – दि पूना ब्लाइंड मेन्स असोसिएशन, एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालयाचे डॉक्टर्स व व्यवस्थापन, डिवाईन जैन ग्रुप ट्रस्ट™चे विश्वस्त व सदस्य, तसेच न्यायाधीश, कोर्ट पोलीस कर्मचारी, न्यायालयीन कर्मचारी आणि अधिवक्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विशेष निमंत्रक म्हणून मा. श्रीमती रेवती देशपांडे, सचिव – जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे आणि श्री. संकेत शहा, अध्यक्ष – डिवाईन जैन ग्रुप ट्रस्ट™ यांची उपस्थिती होती.
यावेळी मा. श्रीमती अंजू एस. शेंडे यांनी न्यायालयाच्या आवारात सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून नेत्र तपासणी शिबिर आयोजित केल्याबद्दल श्री. राजेश शहा आणि श्री. संकेत शहा यांचे आभार मानले. तसेच भविष्यात पुणे शहरात अशाच प्रकारचे सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रम सातत्याने राबविण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय, पुणे आणि डिवाईन जैन ग्रुप ट्रस्ट™ यांच्या सामाजिक बांधिलकीतून आरोग्य, शिक्षण आणि विविध समाजोपयोगी क्षेत्रात सातत्याने उपक्रम राबविले जात आहेत. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून सामाजिक जाणीव आणि आरोग्यसेवेचा संदेश अधोरेखित झाला.

महाराष्ट्र रिपोर्टर बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button