गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंजवडी वाहतूक पोलिसांची धडक कारवाई!. *वरिष्ठ पोलीस अधिकारी राहुल सोनवणे यांची धडाकेबाज कारवाई*

‘आमदार’ असल्याचा भास निर्माण करणारे चिन्ह कारवर लावणाऱ्यावर गुन्हा दाखल

*पिंपरी-चिंचवड 🙁 प्रतिनिधी)*
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. स्वतः आमदार नसतानाही वाहनावर ‘महाराष्ट्र विधानसभा सदस्य’ व ‘आमदार’ असा भास निर्माण करणारे ओळखचिन्ह लावणाऱ्या व्यक्तीविरुद्ध हिंजवडी वाहतूक विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, नईम इसहाक शेख (वय ५०) यांच्या ताब्यातील स्विफ्ट कार क्रमांक एमएच ०३ एएम ३९२७ या वाहनाच्या मागील काचेवर पांढऱ्या-हिरव्या रंगाचा वर्तुळाकार लोगो लावण्यात आला होता. या लोगोवर ‘ *महाराष्ट्र विधानसभा सदस्य’ तसेच ‘आमदार* ’ असा उल्लेख असल्याचे निदर्शनास आले. संबंधित व्यक्ती किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणताही सदस्य आमदार नसतानाही अशा प्रकारचे चिन्ह वापरून लोकप्रतिनिधी असल्याचा भास निर्माण केल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली.
*वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली कारवाई*
हिंजवडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल सोनवणे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाची दखल घेत तातडीने कारवाई केली. गणेशोत्सवाच्या काळात वाहतूक शिस्त अबाधित राहावी तसेच वाहनांवर अनधिकृतपणे पद, अधिकार अथवा लोकप्रतिनिधित्व दर्शविणारी चिन्हे वापरून नागरिकांवर प्रभाव निर्माण करण्याचे प्रकार रोखले जावेत, यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हिंजवडी वाहतूक विभागाकडून विशेष दक्षता घेतली जात आहे.
याप्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक ७१२/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई *पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे, संयुक्त पोलीस आयुक्त श्री. शशिकांत महावरकर, अतिरिक्त पोलीस आयुक्त श्री. सारंग आवाड, पोलीस उपायुक्त (वाहतूक) श्री. विक्रांत देशमुख आणि सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक-२ श्री. सत्यजीत आदमाने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.*
कारवाईमध्ये हिंजवडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल सोनवणे, एएसआय मेराज सौदागर आणि वॉर्डन नागरगोजे यांनी सहभाग घेतला.
गणेशोत्सवात नियमभंग करणाऱ्यांवर करडी नजर
गणेशोत्सवाच्या काळात रस्त्यांवर वाहनांची व नागरिकांची मोठी वर्दळ वाढते. त्यामुळे वाहतूक नियमांचे पालन व्हावे, वाहनांवर अनधिकृत फलक, स्टिकर्स अथवा पददर्शक चिन्हांचा वापर होऊ नये, यासाठी हिंजवडी वाहतूक विभागाकडून विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.
“वाहतूक नियम सर्वांसाठी समान असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोणताही मुलाहिजा न ठेवता कायदेशीर कारवाई केली जाईल,” असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.

महाराष्ट्र रिपोर्टर बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button