
पुणे, १५ ऑक्टोबर २०२६ : ओप्पोने भारतातील एफ-सीरीजला १० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एफ३५ सिरीज लाँच केली. या सिरीजमध्ये ओप्पो एफ३५ प्रो ५जी आणि ओप्पो एफ३५ ५जीचा समावेश आहे. कंपनीने नव्या सिरीजला ‘ग्रुप सेल्फी एक्सपर्ट’ म्हणून सादर केले असून, १०० अंश फील्ड ऑफ व्ह्यूसह ५० मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड फ्रंट कॅमेरा हे त्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.
गेल्या दशकात भारतात एफ-सीरीजचे ३ कोटींहून अधिक स्मार्टफोन्स विकले गेल्याचे कंपनीने सांगितले. एफ३५ प्रोमध्ये ५० मेगापिक्सेल मुख्य कॅमेरा, ओआयएस, ८ मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि फ्रंट व रिअर कॅमेऱ्यांद्वारे ४के व्हिडिओ रेकॉर्डिंगची सुविधा आहे.
दोन्ही मॉडेल्समध्ये ८००० एमएएच बॅटरी, ८० वॅट सुपरव्हूक फ्लॅश चार्ज, वॉटर व डस्ट रेझिस्टन्स आणि दीर्घकाळ टिकणारी कामगिरी देण्यात आली आहे. एफ३५ प्रोमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी ७३६० मॅक्स प्रोसेसर आणि १४४ हर्ट्झ एएमोलेड डिस्प्ले आहे.
एफ३५ प्रो ५जीची किंमत ४५,९९९ रुपयांपासून, तर एफ३५ ५जीची किंमत ३८,९९९ रुपयांपासून सुरू होते. ही सिरीज प्रमुख रिटेल स्टोअर्स, ओप्पो इंडिया ई-स्टोअर, फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनवर उपलब्ध आहे.
