**दिवाळीचा फराळ आता परदेशातही पोहोचणार! पुणे पोस्ट ऑफिसची खास सुविधा*

*पोस्ट ऑफिस सज्ज; फराळासह गिफ्ट पार्सल पाठविण्याची सुविधा उपलब्ध**

*पुणे (प्रतिनिधी)* : दिवाळीच्या सणानिमित्त आपल्या नातेवाइकांना आणि मित्रपरिवाराला फराळाचा आनंद परदेशातही घेता यावा, यासाठी पुणे टपाल विभागाने विशेष सुविधा सुरू केली आहे. या उपक्रमांतर्गत दिवाळीचा फराळ आणि गिफ्ट पार्सल परदेशात पाठविण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

दिवाळीचा फराळ तयार असला, तरी तो परदेशात पाठविण्यासाठी वेळ आणि पॅकिंगची व्यवस्था करणे अनेकांना शक्य होत नाही. ही अडचण लक्षात घेऊन टपाल विभागाने नागरिकांसाठी घरपोच पार्सल पिकअप आणि फराळाचे पॅकिंग करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पोस्टमन घरी येऊन फराळाचे पार्सल विनामूल्य घेऊन जाणार आहेत.

नोकरी आणि शिक्षणासाठी परदेशात वास्तव्यास असलेल्या नागरिकांना दिवाळीच्या सणाला भारतात येणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत आपल्या प्रियजनांना फराळ आणि भेटवस्तू पाठवून त्यांचा सणाचा आनंद द्विगुणित करता यावा, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.

पुणे शहरातील जी.पी.ओ., पुणे शहर मुख्य पोस्ट ऑफिस, चिंचवड ईस्ट, मार्केट यार्ड, पर्वती यांसह प्रमुख पोस्ट ऑफिसमध्ये फराळाच्या पदार्थांचे बॉक्स पॅकिंग करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. आवश्यक पॅकिंग प्रक्रिया पूर्ण करून पार्सल परदेशात पाठविण्यात येणार आहे.

विमानतळ परिसरात नवीन बुकिंग काउंटर

पुणे विमानतळ परिसरातील कार्गो टर्मिनलमध्ये APTMO Pune येथे नवीन बुकिंग काउंटरचे उद्घाटन पुणे क्षेत्राच्या पोस्टमास्टर जनरल श्रीमती प्रीती अग्रवाल आणि डायरेक्टर पोस्टल सर्व्हिसेस श्री. अभिजीत बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले.

हा काउंटर सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहणार असून, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही सेवा उपलब्ध राहणार आहे.

पुणे क्षेत्राच्या पोस्टमास्टर जनरल श्रीमती प्रीती अग्रवाल आणि डायरेक्टर पोस्टल सर्व्हिसेस श्री. अभिजीत बनसोडे यांनी पुणेकरांना या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

📞 फराळ पार्सल पिकअपसाठी संपर्क

दिवाळी फराळ पार्सल पिकअप सेवेसाठी नागरिकांनी खालील क्रमांकांवर संपर्क साधावा.

मोबाईल क्रमांक : 📱 7028007223
📱 8421372317

वेळ : सकाळी ८ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत.

आपल्या माणसांपासून दूर असलेल्या प्रियजनांपर्यंत दिवाळीचा गोडवा पोहोचविण्यासाठी पुणे टपाल विभागाचा हा उपक्रम निश्चितच उपयुक्त ठरणार आहे

महाराष्ट्र रिपोर्टर बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button