२५ डिसेंबर रोजी “से ला व्ही – जीवनाचा आनंदोत्सव” ऋषी गुरुकुलम येथे आयोजन.

पुणे (दि.२२) रविवार २५ डिसेंबर रोजी कातरखडक येथील ऋषी गुरुकुलम मध्ये “से ला व्ही – जीवनाचा आनंदोत्सव” (“C’est La Vie – Cएलेब्रातिंग Life”) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिवसभर चालणारा हा कार्यक्रम ऋषी गुरुकुलम येथे सकाळी १०.३० वाजता सुरु होईल, यात विज्ञान प्रदर्शन आणि फन क्लब उपक्रम, त्यानंतर सहभोजन होईल. संध्याकाळी ६ वाजल्यापासून नृत्य, नाट्य,आणि संगीताचे सादरीकरण होईल. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. सुर्यकांत कुलकर्णी असून ते गेली चार दशके बालहक्क आणि महिलांच्या सक्षामिकरणासाठी काम करणारे अनुभवी व सामाजिक कार्यकर्ते आहेत.तसेच वारे गुरुजी(दत्तात्रय वारे)हे एक प्रसिद्ध शिक्षक,समाजसुधारक आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते आहेत.आशी फॉरेस्ट स्कूलचे दिपाली ठाकुर आणि पवन अय्यंगार- निसर्गाधारीत शिक्षणाचे अग्रदूत. श्री जनार्दन मालपोटे,श्री शंकर चव्हाण, तसेच ज्येष्ठ SSY शिक्षक सौ.केतकी परांजपे, श्री रवी परांजपे,गौतम नाबरीया आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. ऋषी गुरुकुलम ही संस्था सिद्ध समाधी योग (SSY)चे संस्थापक योग ब्रम्ह श्री ऋषी प्रभाकर यांनी स्थापन केलेले निवासी गुरुकुल आहे. भारताच्या गुरुकुल शिक्षणपद्धतीवर आधारित असून आधुनिक आणि पारंपारिक शिक्षणाची सांगड श्री मनोज लेखी यांच्या मार्गदर्शनाखाली घातली आहे. हे गुरुकुल मुळशी तालुक्यातील कातरखडक गावात, हिंजवडीपासून अवघ्या २५ किमी अंतरावर,निसर्गरम्य ५३ एकर परिसरात वसलेले आहे. “से ला व्ही –जीवनाचा आनंदोत्सव हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत खुला आहे. त्याचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन डायरेक्टर नरेंद्र राणे, प्रिन्सिपल तेजल तन्ना,व को ऑर्डीनेटर मानसी कामत यांनी श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत केले.

महाराष्ट्र रिपोर्टर बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button