*प्रा. निलेश आढाव व डॉ .आरती आढाव यांच्याकडून वडिलांच्या मनातील इच्छा पूर्ण; दुष्काळग्रस्तांसाठी ५१ हजार, तर गुणवरेतील सामाजिक कार्यासाठी २५ हजारांची मदत*


पुणे (प्रतिनिधी* ) : आयुष्यभर संघर्ष, कष्ट, जिद्द आणि त्यागाच्या जोरावर आपल्या कुटुंबाला घडविणारे आयुष्यमान चंद्रकांत बबनराव आढाव यांच्या ७५ व्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य सोहळा प्रेम, कृतज्ञता, सामाजिक बांधिलकी आणि मान्यवरांच्या उपस्थितीने अविस्मरणीय ठरला. वडिलांच्या संघर्षमय जीवनप्रवासाला मानवंदना देण्यासाठी त्यांचे सुपुत्र प्रा. निलेश चंद्रकांत आढाव आणि सून डॉ.आरती निलेश आढाव यांनी या सोहळ्याचे अत्यंत दिमाखदार नियोजन केले होते.
या अमृतमहोत्सवी सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे दमदार आमदार शंकरशेठ पांडुरंग जगताप होते. यावेळी चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार अश्विनीताई (माई) लक्ष्मण जगताप, पुणे महानगरपालिकेचे उपमहापौर परशुराम वाडेकर, डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुलाचे कुलपती शिक्षणमहर्षी डॉ. पी. डी. पाटील, भारती विद्यापीठाचे कुलपती ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. शिवाजीराव कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी संघटनेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव ढमढेरे, संघटनेचे माजी उपाध्यक्ष राजाभाऊ नेर्लेकर, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाच्या सभापती सौ. रवीना सागर अंघोळकर, नगरसेवक व विधी समिती सदस्य माऊलीशेठ जगताप, नगरसेवक श्यामभाऊ जगताप, महिला व बालकल्याण समिती सदस्या पल्लवीताई महेश जगताप, माजी महापौर व विद्यमान नगरसेविका शकुंतलाताई दराडे, विद्यमान नगरसेविका स्नेहाताई कलाटे, रिपब्लिकन पक्षाच्या अनुभवी महिला नेत्या चंद्रकांता सोनकांबळे, सातारा जिल्हा परिषद सदस्या प्रा. वैशाली संदीप कांबळे आणि भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संस्थेचे माजी अध्यक्ष बबनराव आबाजी रावडे मामा यांची उपस्थिती लाभली.

याशिवाय कुलपती डॉ. पी. डी. पाटील, प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे, ज्येष्ठ नेते ॲड. जयदेव गायकवाड यांच्यासह विविध शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रांतील मान्यवरांनी या सोहळ्याला उपस्थिती लावून चंद्रकांत तात्या आढाव यांना शुभेच्छा दिल्या. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले साहेब यांनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा देत आढाव कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदविला.
संघर्षातून उभे राहिलेले कर्तृत्व; वडिलांच्या स्वप्नांना मुलाकडून मानवंदना!

चंद्रकांत तात्या आढाव यांचा जीवनप्रवास म्हणजे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर यश मिळविण्याची प्रेरणादायी कहाणी आहे. स्वतःच्या वाट्याला आलेले कष्ट मुलांच्या वाट्याला येऊ नयेत, त्यांना उच्च शिक्षण मिळावे आणि त्यांनी समाजात स्वतःचे स्थान निर्माण करावे, यासाठी त्यांनी आयुष्यभर अपार कष्ट घेतले.
वडिलांनी आयुष्यभर कुटुंबासाठी केलेल्या त्यागाची जाणीव ठेवून प्रा. निलेश आढाव यांनी त्यांच्या ७५ व्या वाढदिवसाला भव्य स्वरूप देण्याचा संकल्प केला. वडिलांच्या मनातील नातेवाईक, गावकरी, मित्रपरिवार आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्याची इच्छा त्यांनी पूर्ण केली. सून डॉ.आरती आढाव यांनीही या नियोजनात मोलाचा सहभाग घेतला.
वाढदिवसाच्या आनंदाला सामाजिक बांधिलकीची जोड!
या सोहळ्याचे विशेष कौतुकास्पद वैशिष्ट्य म्हणजे आनंदाच्या प्रसंगी सामाजिक जाणीव जपण्याचा घेतलेला पुढाकार. चंद्रकांत तात्या यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त दुष्काळग्रस्त बांधवांसाठी ५१ हजार रुपयांची मदत, तर गुणवरे गावातील सामाजिक कार्यासाठी २५ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. त्यामुळे वाढदिवसाचा हा सोहळा केवळ कौटुंबिक आनंदापुरता मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकीचा आदर्श ठरला.
गुणवरेच्या मातीचा अभिमान!
गुणवरे गावातून सुरू झालेला चंद्रकांत तात्यांचा संघर्षमय प्रवास आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. मुलांना उच्चशिक्षित करून सक्षम बनविणाऱ्या पित्याच्या सन्मानार्थ मुलाने आणि सुनेने हजारो लोकांच्या उपस्थितीत आयोजित केलेला हा सोहळा आढाव कुटुंबाच्या संस्कारांचा आणि कृतज्ञतेचा सुंदर आविष्कार ठरला.
वडिलांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित या अमृतमहोत्सवी सोहळ्यात उपस्थित मान्यवर, नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांनी चंद्रकांत तात्या आढाव यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. त्यांच्या पुढील आयुष्यास उत्तम आरोग्य, आनंद आणि दीर्घायुष्य लाभो, अशा सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या.
वडिलांच्या संघर्षाचा सन्मान, मुलांच्या कृतज्ञतेचा आविष्कार आणि समाजसेवेचा आदर्श असा त्रिवेणी संगम घडविणारा चंद्रकांत तात्या आढाव यांचा अमृतमहोत्सवी सोहळा गुणवरेच्या सामाजिक आणि कौटुंबिक इतिहासात संस्मरणीय ठरला!
