सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये कॉफी विथ यशोमती ठाकूर विद्यार्थी मेळाव्यामध्ये संविधान प्रचारक सागर सोनकांबळे यांना संविधान सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला.

हा पुरस्कार माननीय माजी आमदार व मंत्री यशोमती ठाकूर यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
सागर सोनकांबळे हे संविधानावरील सखोल अभ्यासक असून, समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता या संविधानिक मूल्यांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी ते महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत आहेत. बाबासाहेब डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा बसवेश्वर, अहिल्याबाई होळकर, संत सेवालाल महाराज या महापुरुषांच्या विचारांचा वारसा समाजापर्यंत पोहोचवण्याचे काम ते सातत्याने करीत आहेत.
या कार्यक्रमाचे आयोजन NSUI चे प्रदेश उपाध्यक्ष अक्षय कांबळे आणि पुणे जिल्हा उपाध्यक्ष सिद्धांत जांबुळकर यांनी केले होते. कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवर, विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुरस्कार स्वीकारताना सागर सोनकांबळे यांनी हा सन्मान समग्र आंबेडकर चळवळीला, बाबासाहेबांच्या विचारांना तसेच समता आणि बंधुतेच्या प्रवाहाला समर्पित करत असल्याची भावना व्यक्त केली. आपल्या भाषणात त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि भारताचे भवितव्य हे कसे एकमेकांशी घट्टपणे जोडलेले आहे, यावर सखोल मांडणी केली.
हा कार्यक्रम संविधानिक मूल्यांची जाणीव निर्माण करणारा आणि तरुण पिढीला विचारशील बनवणारा ठरला, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र रिपोर्टर बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button