VISTA 2K26 ला उत्स्फूर्त प्रतिसाद – २००० विद्यार्थ्यांचा भव्य सहभाग

पुणे, दि. १ मार्च २०२६ — साईबालाजी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य शैक्षणिक, क्रीडा आणि व्यवस्थापन महोत्सव VISTA 2K26 ची दिमाखदार सांगता उत्साहपूर्ण वातावरणात २२ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०२६ दरम्यान पार पडली. यंदाच्या महोत्सवात तब्बल २००० हून अधिक विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवत कार्यक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद दिला.

यापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या ड्युअथलॉन आणि मॅरेथॉन स्पर्धांना १००० पेक्षा अधिक स्पर्धकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. विशेष म्हणजे या स्पर्धांमध्ये RFID ट्रॅकिंग तंत्रज्ञानाचा वापर करून स्पर्धकांच्या वेळेची अचूक नोंद करण्यात आली होती, ज्यामुळे स्पर्धा अधिक पारदर्शक आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम ठरल्या. “VISTA 2K26 – द ऑलिम्पिक डिस्टन्स ड्युअथलॉन” हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या क्रीडागुणांना चालना देणारा ठरला.

शैक्षणिक क्षेत्रात १९वी अनिल रघुवंशी स्मृती राष्ट्रीय बिझनेस प्लॅन स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. विविध महाविद्यालयांमधून आलेल्या संघांनी नाविन्यपूर्ण व्यवसाय कल्पना सादर करून परीक्षकांचे लक्ष वेधले.सांस्कृतिक स्पर्धांनी महोत्सवात रंगत आणली.

संस्थेचे अध्यक्ष प्रा.मनीष मुंदडा यांनी आपल्या मनोगतात सांगितले, “VISTA 2K26 हा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक सक्षम व्यासपीठ ठरला आहे. केवळ शैक्षणिक गुणवत्ता नव्हे, तर नेतृत्व, नवोन्मेष आणि क्रीडागुण यांना चालना देणे हेच आमचे ध्येय आहे. २००० विद्यार्थ्यांचा सहभाग ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.”

तसेच संस्थेच्या सचिव प्रा.निरुपमा मुंदडा यांनी नमूद केले, “विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, संघभावना आणि स्पर्धात्मक वृत्ती निर्माण करणे हा VISTA चा मुख्य उद्देश आहे. यंदाच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आमचा विश्वास अधिक दृढ झाला असून, पुढील वर्षी हा महोत्सव अधिक व्यापक स्वरूपात आयोजित केला जाईल.”

समारोप सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. २००० विद्यार्थ्यांच्या विक्रमी सहभागामुळे VISTA 2K26 ने यंदा नवा इतिहास घडवला असून, हा महोत्सव संस्थेच्या शैक्षणिक परंपरेतील एक अभिमानास्पद पर्व ठरला आहे.

महाराष्ट्र रिपोर्टर बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button