जम्मू-काश्मीर आणि लडाख सीमेवरील भागात पुणेकरांकडून “हर घर शिक्षा घर घर शिक्षा” अभियान

पुणे : शिक्षण हे समाजाच्या प्रगतीचे सर्वात प्रभावी साधन मानले जाते. याच उद्देशाने पुण्यातील “आम्ही पुणेकर” आणि “नर्चर वर्क्स” या संस्थांच्या पुढाकारातून जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या सीमावर्ती भागात “हर घर शिक्षा घर घर शिक्षा” हे अभियान राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत सीमावर्ती गावांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि वैद्यकीय स्वरूपात विविध मदत पुरविण्यात येणार आहे.
या उपक्रमात हेक्स्ट इंडिया लिमिटेडचे चेअरमन भारत डुंबरे, तसेच नर्चर वर्क्स संस्थेचे संस्थापक विद्या भंडारे, सरफराजखान अन्सारी शाह, उमेश गोरखा, संतोषकुमार (जनरल शाह), अक्षय मेहता, समीर जाधव आदी मान्यवर सहभागी होणार आहेत.
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, राज्यपाल मनोज सिन्हा आणि लडाखचे उपराज्यपाल ब्रिगेडियर डॉ. बी. डी. मिश्रा यांच्या उपस्थितीत हा उपक्रम पार पडणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
या अभियानांतर्गत सीमावर्ती गावांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट (लॅपटॉप, स्टेशनरी, गणवेश आणि डिजिटल शिक्षण साहित्य) देण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाची संधी मिळावी यासाठी डिजिटल साक्षरता आणि ई-लर्निंग यावर विशेष भर दिला जाणार आहे.
पहिल्या टप्प्यात सुमारे २५ हजार शैक्षणिक किट वितरित करण्यात येणार असून त्यामध्ये ५ हजार शालेय पिशव्या, स्टेशनरी साहित्य, गणवेश, नोटबुक्स तसेच सुमारे ४ हजार प्राथमिक पुस्तके आणि ५०० डिजिटल टॅबलेट्स यांचा समावेश आहे.
याशिवाय सीमावर्ती भागातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षण, राष्ट्रभक्ती आणि सामाजिक जाणीव वाढविण्यासाठी विविध जागरूकता कार्यक्रम, कला-निबंध-वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविणे आणि समुदाय सहभाग मजबूत करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या अभियानात जम्मू, श्रीनगर, उधमपूर, पुंछ, अनंतनाग, कारगिल आणि लेह या सीमावर्ती भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत केली जाणार आहे.
— हेमंत जाधव
मो. 9822256453

महाराष्ट्र रिपोर्टर बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button