सिंधू सेवा दलातर्फे शुक्रवारी (ता.20मार्च)”चेटीचंड’ महोत्सव

पुणे : सिंधी समाजाचे नूतन वर्ष व भगवान साई झुलेलाल यांच्या १०७६ व्या जन्मोत्सवानिमित्त सिंधू सेवा दलातर्फे ‘चेटीचंड’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या शुक्रवारी (दि. 20 मार्च) हा महोत्सव डेक्कन कॉलेज बँक्वेट हॉल, डेक्कन कॉलेज ग्राउंड, बॉम्बे सॅपर्स जवळ, येरवडा, पुणे येथे होणार आहे, अशी माहिती सिंधू सेवा दलाचे अध्यक्ष सचिन तलरेजा यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी सिंधू सेवा दलाचे माजी अध्यक्ष सुरेश जेठवानी, अशोक वासवानी ऍड. हरेश हेमराजानी व विजय दासवानी, सचिव जय पिंजानी, सहसचिव किरण फेरवानी, खजिनदार राजेंद्र फेरवानी व जनसंपर्क अधिकारी देवेंद्र चावला आदी उपस्थित होते.

सचिन तलरेजा म्हणाले, “चेटीचंड महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम आणि सिंधी समाज बांधवांचा मेळावा होणार आहे. सायंकाळी ७ वाजता भगवान साई झुलेलाल यांच्या प्रतिमेचे पूजन व आरती करून सामाजिक आणि सांस्कृतिक महोत्सवाची सुरुवात होईल. यंदाचा चेटीचंड महोत्सव महिला सक्षमीकरणावर आधारित आहे. संपूर्ण महिलांचा कलाकारांच्या संचाकडून यंदा सादरीकरण होणार आहे. यामध्ये संगीतकार, गायक, वादक सर्वच कलाकार महिला असून, त्यांच्यातील क्षमता, कल्पकता आणि नेतृत्व पुणेकरांना अनुभवता येणार आहे. जयपूर, भोपाळ, मुंबई, नागपूर, कोलकाता आदी शहरांतून हे कलाकार येत आहेत.”

या महोत्सवासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नेटवर्क १८ ग्रुपचे व्यवस्थापकीय संपादक किशोर आजवानी असणार आहेत. सिंधी समाजात कपिल शर्मा अशी ओळख असलेल्या मोहित शेवानी कार्यक्रम संचालित करणार आहे. जनरेशन नेक्स्ट डान्स अकँडमीतर्फे नृत्यकलेचे सादरीकरण होणार आहे. त्यानंतर प्रीतिभोजने (महाप्रसाद) महोत्सवाची सांगता होईल. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील चार ते साडेचार हजार अधिक सिंधी बांधव या महोत्सवात सहभागी होतील. सिंधी समाजाचा विकास करून समाजाच्या संस्कृतीविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे व सिंधू समाजाच्या परंपरा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्याचा आमचा मानस आहे. सिंधू सेवा दल गेली ३९ वर्ष कार्यरत आहे,” असे सुरेश जेठवानी यांनी नमूद
पत्रकार परिषदेत डावीकडून (बसलेले) विजय दासवानी, अशोक वासवानी, सुरेश जेठवानी, सचिन तलरेजा, ऍड. हरेश हेमराजानी. (उभे) किरण फेरवानी, जय पिंजानी, देवेंद्र चावला व राजेंद्र फेरवानी.

महाराष्ट्र रिपोर्टर बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button