आनंदी युनिव्हर्स सोहळा 2026” हा भव्य आणि प्रेरणादायी उपक्रम नाशिक येथे अत्यंत उत्साहात व दिमाखात संपन्न झाला.

महिला उद्योजक आणि युवा उद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित या सोहळ्याने उपस्थितांमध्ये नवचैतन्य निर्माण केले.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री स्वरा राजपूत यांनी उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवली. त्यांच्या प्रेरणादायी उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष उंची प्राप्त झाली आणि अनेक नवउद्योजकांना नवे ध्येय मिळाले.

संस्थेचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे मुख्य संयोजक गणेश रामदास विटकर यांच्या कुशल नेतृत्वाखाली हा सोहळा यशस्वीरित्या पार पडला. कार्यक्रमात गोदा इंटरटेनमेंटचे दिलीप जाधव, सुप्रसिद्ध निवेदक गणेश मोढवे, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उद्योजक, कृषी तज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

या सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना “राष्ट्रीय गौरव पुरस्कार 2026” देऊन सन्मानित करण्यात आले. त्यापैकी गायन क्षेत्रात विशेष योगदानासाठी मा. गायत्री अमोघ कुलकर्णी यांना “सुरेल आवाजाची सृजनहार” या विशेष गौरवासह राष्ट्रीय गौरव पुरस्कार 2026 प्रदान करण्यात आला. त्यांच्या मधुर आणि प्रभावी गायनामुळे त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले असून त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अहमदाबादमध्ये गायत्रीला पाठिंबा देणारे अनेक संगीत क्षेत्रातील दिग्गज आणि आयोजक आहेत. उदाहरणार्थ: गुरुपाल सिंग, संजय तन्ना, वर्षा कुलकर्णी, भावेश व्यास, सीमा पटेल, हार्दिक सोनी, संजीव कीर्तणे, नयना रावल, इत्यादी..
या पुरस्काराचे श्रेय गायत्रीला पाठिंबा देणाऱ्या सर्व आयोजकांना जाते.

संपूर्ण कार्यक्रमात उत्कृष्ट नियोजन, आकर्षक सादरीकरण आणि प्रेरणादायी वातावरण यामुळे उपस्थित सर्वांना एक अविस्मरणीय अनुभव मिळाला. “आनंदी युनिव्हर्स फाउंडेशन” च्या या उपक्रमामुळे समाजातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना नवे प्रोत्साहन मिळाले असून अशा उपक्रमांची भविष्यात अधिक मोठ्या प्रमाणावर अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्र रिपोर्टर बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button