योगसाधनेतून मिळते तणावमुक्त जीवनडॉ. राहुल कराड यांचे विचार ः डब्ल्यूपीयूत १२वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

पुणे,२२ जूनः “शारीरिक व मानसिक आरोग्यसाठी योग हे भारताने जगाला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. प्रत्येकाने योगाचा दैनदिंन जीवनात अवलंब करावा. ” असे आवाहन एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड यांनी केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी तर्फे १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या प्रांगणात साजरा करण्यात आला. ‘निरोगी वृद्धत्वासाठी योगसाधना’ ही या वर्षीची संकल्पना होती.
या प्रसंगी योगगुरू अनुप मुरली यांनी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना योगाचे प्रशिक्षण देऊन मार्गदर्शन केले. एमआयटी डब्ल्यूपीयूचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या आर्शीवादाने व मार्गदर्शनात योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या वेळी एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, सीएओ डॉ. प्रसाद खांडेकर आणि डॉ. पल्लवी कव्हाने उपस्थित होते.
डॉ. राहुल कराड म्हणाले, “या विद्यापीठात विद्यार्थ्यांना योग शिकविला जात आहे. येथील विद्यार्थी शारीरिक व मानसिक दृष्ट्या प्रगल्भ आहे. योगाचे प्रशिक्षण देणारी ही एकमात्र युनिव्हर्सिटी आहे. ”
डॉ. आर.एम.चिटणीस म्हणाले, ” मानवतेसाठी योग अत्यंत महत्वाचे तर आहेत पण यामध्ये एकसंघपणा आणि मानवतेचा अर्थ दडलेला आहे. निसर्गाने मानवाला दिलेली सर्वात मोठी देणगी म्हणजे योग आहे. ”
आकाश यांनी आभार मानले.

महाराष्ट्र रिपोर्टर बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button