
133 गरजूंना मोफत कृत्रिम अवयव बसविण्याचा उपक्रम यशस्वी
मध्य प्रदेश – डिवाइन जैन ग्रुप ट्रस्ट™, मध्य प्रदेश शाखेच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत एक अत्यंत स्तुत्य व मानवतावादी उपक्रम राबविण्यात आला. कृत्रिम हात, पाय व इतर अवयव बसविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मोफत शिबिरामध्ये 133 हून अधिक गरजू नागरिक व बालकांना लाभ मिळाला.
या उपक्रमामुळे अनेक दिव्यांग बांधवांना नवजीवनाची संधी मिळाली असून त्यांच्या आयुष्यात नव्या आशा आणि आत्मविश्वासाची किरणे निर्माण झाली आहेत. या शिबिराने समाजात सेवा, सहकार्य व माणुसकीचा आदर्श निर्माण केला आहे.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डिवाइन जैन ग्रुपचे अभिषेक सेठिया, प्रसन्ना जैन, मनोज जैन, राहुल कटारिया, प्रदीप पीपाडा तसेच सर्व टीम सदस्यांचे मोलाचे योगदान लाभले. त्यांच्या या कार्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
डिवाइन जैन ग्रुप ट्रस्ट™ भविष्यातही अशाच सामाजिक उपक्रमांद्वारे गरजू घटकांना मदतीचा हात देत राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
सादर,
संकेत शहा
डिवाइन जैन ग्रुप ट्रस्ट™

