
पुणे – मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे नेस वाडिया वाणिज्य महाविद्यालय येत्या १६ जुलै २०२६ रोजी ५८ वा वर्धापन दिन साजरा करीत आहे त्या निमित्याने महाविद्यालयाच्या टाटा असेंब्ली हॉल मध्ये दुपारी १२.३० पासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून ‘स्कॉलर ऑफ द ईयर’ पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती प्राचार्या डॉ. वृषाली रणधीर यांनी पत्रकार परिषदेत दिली त्याच बरोबर इंडिया टुडे च्या सर्वेक्षणानुसार नेस वाडिया वाणिज्य महाविद्यालय पुण्यात पहिले आणि भारतात दुसऱ्या क्रमांकावर आल्याचे सांगितले. या वेळी उपप्राचार्य डॉ महेंद्र आगळे,अमोल गायकवाड, प्रा. डॉ.लक्ष्मण बैसाणे,लक्ष्मण गावडे उपस्थित होते.
प्रा.डॉ. वृषाली रणधीर म्हणाल्या, वर्धापन दिना निमित्त्य यंदा महाराष्ट्र असोसिएशन ऑफ ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर्स (MTPO) चे अध्यक्ष तसेच पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (PCET)-मूलन समूह, पुणे येथील उद्योग-संस्था संवाद व केंद्रीय प्रशिक्षण व प्लेसमेंट सेलचे अधिष्ठाता प्रा. डॉ. शितलकुमार रावंडले यांचे “विद्यार्थ्यांच्या रोजगार संधी – प्राध्यापकांची भूमिका” या विषयावरील व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
