
पुणे, दि. २७ जुलै २०२६ (प्रतिनिधी) : पुणे शहराच्या वैभवशाली इतिहासाचा अविभाज्य भाग असलेल्या पुणे जंक्शन रेल्वे स्थानकाने १०१ गौरवशाली वर्षे पूर्ण केल्याच्या निमित्ताने *डिवाईन जैन ग्रुप ट्रस्ट™* यांच्या वतीने विशेष केक कटिंग समारंभ व मिठाई वितरण कार्यक्रम उत्साहात आयोजित करण्यात आला.
*पुणे स्टेशन संचालक श्री. नरेंद्र धवळे तसेच श्री. मदनलाल मीना (IRTS)* यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. या कार्यक्रमादरम्यान रेल्वे कर्मचारी, हाऊसकीपिंग कर्मचारी, कुली (पोर्टर), प्रवासी आणि रेल्वे प्रशासनाशी संबंधित विविध घटकांसह ३०० हून अधिक नागरिकांना केक व मिठाईचे वाटप करण्यात आले.
यावेळी *डिवाईन जैन ग्रुप ट्रस्ट™चे अध्यक्ष श्री. संकेत शहा* यांनी पुणे जंक्शन रेल्वे स्थानकाला १०१ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शुभेच्छा देताना सांगितले की, “पुणे रेल्वे स्थानक हे शहराच्या समृद्ध वारशाचे, प्रगतीचे आणि ओळखीचे प्रतीक आहे. स्मार्ट आणि आधुनिक पुण्याच्या विकासात रेल्वेची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. रेल्वे प्रशासनासोबत सामाजिक बांधिलकी जपत शहराच्या विकासासाठी आणि रेल्वे समुदायाच्या कल्याणासाठी कार्य करण्याचा आम्हाला अभिमान वाटतो.”
ते पुढे म्हणाले की, भविष्यातही डिवाईन जैन ग्रुप ट्रस्ट विविध सामाजिक, जनहितकारी आणि सेवाभावी उपक्रमांच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनासोबत समन्वय साधून समाजहिताची कार्ये राबवत राहील.
या कार्यक्रमाला ट्रस्टचे विश्वस्त श्री. राजेश ओसवाल, श्री. अमित जनजानी, सौ. प्रियंका शहा, श्री. चेतन जैन आणि श्री. तनीष जैन यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच सदस्य अक्षत बाफना, राहुल कोठारी, आगम शहा, मेहुल जैन आणि मोनाली धोत्रे यांच्यासह रेल्वे कर्मचारी, हाऊसकीपिंग कर्मचारी, कुली (पोर्टर) व प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन व समन्वय PRME – The Influence Co. यांच्या वतीने करण्यात आले.
पुणे जंक्शनच्या १०१ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित या उपक्रमामुळे रेल्वे प्रशासन, कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, डिवाईन जैन ग्रुप ट्रस्टच्या सामाजिक बांधिलकीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
