*गौरव गणेश घुले यांच्या प्रचाराचा उत्साहात शुभारंभ*

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २० – शंकर महाराज मठ, बिबेवाडी परिसरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. फुले–शाहू–आंबेडकर यांच्या विचारधारेवर काम करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तरुण, तडफदार आणि सुवर्णपदक विजेते आंतरराष्ट्रीय खेळाडू गौरव गणेश घुले यांनी निवडणुकीच्या रिंगणात अधिकृत प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज उत्साहात पार पडला.
प्रचारादरम्यान नागरिकांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळत असून, तरुण उमेदवार म्हणून गौरव घुले यांना मतदारांकडून विशेष पाठिंबा मिळत आहे. स्थानिक उमेदवार असल्याने संपूर्ण प्रभागाला आपले कुटुंब मानून काम करण्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. नागरिकांच्या दैनंदिन समस्या, विकासाचे प्रश्न तसेच युवकांच्या अपेक्षा यांची त्यांना सखोल जाण असल्याचे प्रचारात दिसून येत आहे.
गौरव घुले यांचे वडील श्री. गणेश सोपानराव घुले हे सुरुवातीपासून समाजकार्यात सक्रिय असून, क्रीडाक्षेत्रातील योगदान, शेतकरी बांधवांसाठी केलेले कार्य, कृषी उत्पन्न बाजार समितीतील संचालकपद तसेच बँकिंग क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवामुळे त्यांचा सामाजिक वारसा गौरव घुले यांना लाभलेला आहे.
संयमी, अभ्यासू नेतृत्व आणि विकासाचे स्पष्ट ध्येय घेऊन प्रभागात सकारात्मक परिवर्तन घडवण्याचा निर्धार गौरव घुले यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक २० मध्ये सध्या त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू असून, तरुण नेतृत्वाला मिळणाऱ्या वाढत्या प्रतिसादामुळे ही निवडणूक चुरशीची ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
