*इनामदार हॉस्पिटलमध्ये जागतिक हृदय दिन उत्साहात साजरा*

*हृदयाच्या आरोग्याबाबत जनजागृतीचा संदेश; हृदयरोगतज्ज्ञांनी दिले आरोग्यविषयक मार्गदर्शन*

पुणे (प्रतिनिधी) :
जागतिक हृदय दिनानिमित्त फातिमानगर येथील इनामदार मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जागतिक हृदय दिन उत्साहात साजरा करण्यात आला. हृदयाचे आरोग्य जपणे, हृदयरोगांबाबत जनजागृती करणे आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब करण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी हॉस्पिटलचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. गौरव गणेशवाला, वैद्यकीय संचालिका.. डॉ . हसमुख गुजर..डॉ. वृषाली रात्रा इनामदार, आयसीयू प्रमुख डॉ. दिपाली डी. अर्देशना, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मंदार देव, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. नाजनीन खान आणि सीसीयू प्रमुख डॉ. माऊली यांची उपस्थिती होती.

हृदयविकार हा आजच्या काळातील एक महत्त्वाचा आरोग्यविषयक प्रश्न बनला असून, बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव, अयोग्य आहार, ताणतणाव आणि आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. त्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी नियमित व्यायाम, संतुलित आहार, पुरेशी झोप, ताणतणावाचे व्यवस्थापन आणि वेळोवेळी आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे, असा जनजागृतीपर संदेश यानिमित्ताने देण्यात आला.

हृदयविकाराची लक्षणे वेळीच ओळखणे आणि योग्य वेळी वैद्यकीय सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. हृदयाच्या आरोग्याबाबत प्रत्येकाने जागरूक राहून स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांच्या वतीने करण्यात आले.

‘हृदय निरोगी, तर जीवन निरोगी’ हा संदेश देत इनामदार हॉस्पिटलच्या वैद्यकीय पथकाने जागतिक हृदय दिनानिमित्त हृदयविकार प्रतिबंध आणि आरोग्यविषयक जनजागृतीचे महत्त्व अधोरेखित केले.

महाराष्ट्र रिपोर्टर बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button