
पाथर्डी, १५ एप्रिल २०२६ – गेल्या ९ एप्रिल रोजी रात्री राहत्या घरून बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीचा शोध SHIELD Cyber Forensic Investigation या संस्थेच्या तंत्रज्ञानाच्या मदतीने यशस्वीरीत्या घेण्यात आला. पाथर्डी पोलिसांनी दि. १४ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता एफआयआर नोंदवली होती. त्यानंतर केवळ तीन तासांत संध्याकाळी ६ वाजता पोलिसांनी मुलीला ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, SHIELD ने लोकेशन यूज न करता शिल्ड च्या ट्रॅकिंग system ने शोध लावला,यांच्या माध्यमातून मुलीचा ठावठिकाणा शोधून काढला. त्यानंतर पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक (PSI) चव्हाण साहेब व त्यांच्या पथकाने तात्काळ कारवाई करत आडिच तासात मुलीला सुखरूप ताब्यात घेतले.
या प्रकरणी बोलताना तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, “आजवर आम्ही ३०० हून अधिक बेपत्ता प्रकरणांवर यशस्वीरीत्या काम केले आहे. सामान्य नागरिकांच्या समस्यांवर उपाय होत असतील तर मी आयुष्यभर असेच प्रयत्न करत राहीन.”
अधिक तपास सुरू असून, मुलगी सदैव सुरक्षित असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तिच्या गायब होण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस अधिक तपास करत आहेत.
