*पुण्यात ‘भारत की बेटी अवॉर्ड २०२६’ उत्साहात संपन्न*

*मातृदिनानिमित्त विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव*

*१ लाख स्त्रीशक्तीला सन्मानित करण्याचा सुमित आंबेकर यांचा संकल्प*

पुणे: मीडिया वर्ल्ड तर्फे आयोजित ‘भारत की बेटी अवॉर्ड २०२६’ हा भव्य सन्मान सोहळा मातृदिनाच्या पार्श्वभूमीवर पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रोड, पुणे येथे उत्साहात संपन्न झाला. समाजात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, कलाकार, उद्योजक आणि नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून डॉ. नीलमताई गोऱ्हे उपस्थित होत्या. प्रमुख पाहुण्यांमध्ये अंकिता पाटील ठाकरे तसेच यांचा समावेश होता. कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेते देव गिल, मिस अर्थ इंडिया 2025 कोमल चौधरी, अभिनेत्री केसरी तसेच अभिनेता प्रसाद शिखरे, संतोष जगताप, मारुती भंडारी, शशिकांत कांबळे, गीतसानिया कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती लाभली. महाराष्ट्रासह देशभरातील विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या महिलांना यावेळी सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन मीडिया वर्ल्ड चे संस्थापक सुमित अंबेकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. तसेच श्री प्रमोद गोळे, व व्यावसायिक मार्गदर्शक एस एस सावंत यांचे सहकार्य लाभले.

यावेळी बोलताना श्री. सुमित अंबेकर म्हणाले, “‘भारत की बेटी अवॉर्ड २०२६’ हा समाजात प्रेरणादायी कार्य करणाऱ्या महिलांच्या योगदानाचा सन्मान करण्याचा प्रयत्न आहे. विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या कार्याची समाजाला प्रेरणा मिळावी हा या उपक्रमामागील उद्देश आहे.” देशातील एक लाख महिलांना हा सन्मान मिळवून देण्याचा संकल्प देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ. नीलमताई गोऱ्हे म्हणाल्या, “आज महिला शासन, शिक्षण, आरोग्य, उद्योग, समाजकारण आणि सार्वजनिक जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत आहेत. अशा महिलांचा गौरव केल्याने समाजात सकारात्मक प्रेरणा निर्माण होते.”

‘नारी शक्ती – राष्ट्र शक्ती’ या संकल्पनेवर आधारित या उपक्रमासाठी पुणे शहरात विविध सामाजिक माध्यमांद्वारे जनजागृती मोहीम, होर्डिंग्ज आणि प्रचार उपक्रम राबविण्यात आले होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुनील धनगर आणि सौ. मयुरी येवले यांनी केले तर आभार इसे एस. एस. सावंत यांनी मानले.

महाराष्ट्र रिपोर्टर बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button