अपोलो हॉस्पिटल्स पुणेकडून ५०० हून अधिक पुणे पोलिसांना CPR आणि BLS प्रशिक्षण*

पुणे : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांचे प्राण वाचविण्यासाठी पोलिसांना आवश्यक वैद्यकीय कौशल्ये मिळावीत या उद्देशाने अपोलो हॉस्पिटल्स, स्वारगेट, पुणे आणि पुणे पोलीस आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमाने CPR व BLS प्रशिक्षण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. शिवाजीनगर येथील पोलीस आयुक्त कार्यालयात पार पडलेल्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या विशेष प्रशिक्षण शिबिरामध्ये जवळपास ५०० पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. अपोलो हॉस्पिटल्स, स्वारगेट, पुणे येथील एचओडी इमरजेंसी मेडिसिन अँड एक्यूट केअर डॉ. सुजय पाटील यांनी वर्ल्ड इमरजेंसी मेडिसिन डेच्या पार्श्वभूमीवर उपस्थितांना CPR (Cardiopulmonary Resuscitation) आणि बेसिक लाईफ सपोर्ट (BLS) याबाबत प्रत्यक्ष प्रशिक्षण व मार्गदर्शन केले.
तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने लाइव्ह डेमोद्वारे हृदयविकाराचा झटका, श्वासोच्छ्वास बंद होणे अशा आपत्कालीन प्रसंगी तातडीने कशाप्रकारे मदत करावी याचे प्रात्यक्षिक दाखविले. समाजामध्ये आपत्कालीन आरोग्यविषयक जनजागृती वाढविणे आणि पोलिसांना अधिक सक्षम बनविणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
कॅप्शन : अपोलो हॉस्पिटल्स, स्वारगेट, पुणे आणि पुणे पोलीस आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित CPR व BLS प्रशिक्षण उपक्रमात पुणे पोलिसांना मार्गदर्शन करताना डॉ. सुजय पाटील व तज्ज्ञांची टीम.

महाराष्ट्र रिपोर्टर बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button