
पुणे, २३ जुलै २०२६ : जगातील सर्वात मोठी होमिओपॅथी क्लिनिक साखळी असलेल्या डॉ. बत्राज्® हेल्थकेअरच्या पुण्यातील शिवाजीनगर क्लिनिकने यशस्वी सेवेला २५ वर्षे पूर्ण केली. या रौप्यमहोत्सवी सोहळ्याच्या निमित्ताने संस्थेच्या विश्वासार्ह, सुरक्षित आणि पुराव्यावर आधारित होमिओपॅथिक आरोग्यसेवेचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाला पद्मश्री डॉ. मुकेश बत्रा, संस्थापक व चेअरमन एमेरिटस, डॉ. बत्राज्®, यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर, रुग्ण आणि हितचिंतक उपस्थित होते.
रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त डॉ. बत्राज्®ने केस आणि त्वचेसाठी अत्याधुनिक, नॉन-इनव्हेसिव्ह उपचार सादर केले. यामध्ये HairGain या ५० अब्ज एक्सोसोम्सवर आधारित प्रगत केस पुनर्वृद्धी उपचाराचा समावेश असून, आनुवंशिक टक्कलपणा, ताणामुळे होणारे केस गळणे, प्रसूतीनंतर व रजोनिवृत्तीनंतर होणाऱ्या केसांच्या समस्यांवर हा उपचार प्रभावी ठरत असल्याचे सांगण्यात आले. तसेच एक्सोसोम तंत्रज्ञान आणि होमिओपॅथी यांचा संगम असलेली त्वचा पुनरुज्जीवन उपचार पद्धतीही सादर करण्यात आली. ही उपचारपद्धती हायपरपिग्मेंटेशन, सुरकुत्या, त्वचेवरील वृद्धत्वाची लक्षणे आणि असमान त्वचेचा पोत यावर लक्ष केंद्रित करते.
याशिवाय श्वसनविकारांसाठी OxyLung, अॅलर्जी व्यवस्थापनासाठी Allergone, मधुमेह नियंत्रणासाठी BFit SugaControl, वजन नियंत्रणासाठी BFit Weight Control, मानसिक आरोग्यासाठी MindFit तसेच पीसीओएस व्यवस्थापनासाठी विशेष कार्यक्रम उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली.
यावेळी पद्मश्री डॉ. मुकेश बत्रा म्हणाले, “पुण्यातील आमच्या शिवाजीनगर क्लिनिकच्या २५ वर्षांच्या प्रवासाचा आनंद साजरा करताना मला अत्यंत अभिमान वाटतो. पुणे हे देशातील होमिओपॅथीचे महत्त्वाचे केंद्र राहिले आहे आणि गेल्या २५ वर्षांपासून आम्ही या शहराच्या आरोग्यसेवेत योगदान देत आहोत. पुण्यातील पहिल्या क्लिनिकपासून आज शहरात सात आणि महाराष्ट्रात एकूण २९ क्लिनिक्सपर्यंत आमचा विस्तार झाला आहे. गेल्या दोन दशकांत भारतातील आरोग्य क्षेत्रात मोठे बदल झाले असून संसर्गजन्य आजारांबरोबरच जीवनशैलीशी संबंधित आजारांचे प्रमाणही वाढले आहे. अशा परिस्थितीत प्रतिबंधात्मक आणि पूरक आरोग्यसेवेमध्ये होमिओपॅथीची महत्त्वाची भूमिका आहे. आधुनिक होमिओपॅथी आणि प्रगत तंत्रज्ञानाचा संगम साधून सुरक्षित, परिणामकारक आणि रुग्णकेंद्रित उपचार देण्याची आमची बांधिलकी कायम राहील.”
डॉ. बत्राज्®च्या शिवाजीनगर क्लिनिकच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त संस्थेने गुणवत्तापूर्ण होमिओपॅथिक आरोग्यसेवा आणि नाविन्यपूर्ण उपचारपद्धतींच्या माध्यमातून रुग्णांच्या आरोग्याचा दर्जा उंचावण्याचा निर्धार पुन्हा व्यक्त केला.
पत्ता : डॉ. बत्राज्® क्लिनिक, ए-४५, ग्राउंड फ्लोअर, कपिल टॉवर्स, जुने आरटीओ कार्यालयाजवळ, शिवाजीनगर, पुणे – ४११००१.
