
पुणे, दि. ९ ऑगस्ट २०२६ : प्रसिद्ध ज्वेलरी ब्रँड ‘ईवी – टाइमलेस लग्जरी’ (EEVEE Timeless Luxury) या ब्रँडच्या नव्या आणि एक्सक्लुझिव्ह सिल्वर ज्वेलरी शोरूमचा भव्य शुभारंभ रविवारी (९ ऑगस्ट) जगताप डेअरी रोड, पुणे येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या उद्घाटनाचे वैशिष्ट्य म्हणजे गौवंशीय बछड्याला शोरूममध्ये आदरपूर्वक प्रवेश देऊन त्याचे पूजन करण्यात आले. या मंगलमय वातावरणात शोरूमचा शुभारंभ करण्यात आल्याने उद्घाटन सोहळ्याला विशेष धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले.
हे नवीन शोरूम शॉप नं. ९, कुंजीर श्यामा प्रेस्टिज, ‘ए’ विंग, जगताप डेअरी रोड, पुणे – ४११०१८ येथे सुरू करण्यात आले आहे. या प्रसंगी गोवर्धन के. रादड़िया (सूरत) हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
‘ईवी’ ब्रँड शुद्धता, आकर्षक डिझाइन्स आणि आधुनिक सिल्वर ज्वेलरी कलेक्शनसाठी ओळखला जातो. पुणेकर ग्राहकांना चांदीच्या दागिन्यांचे आधुनिक, आकर्षक आणि दर्जेदार कलेक्शन एकाच छताखाली उपलब्ध करून देणे, हा या नवीन शोरूमचा प्रमुख उद्देश असल्याचे संचालकांनी सांगितले.
दरम्यान, शोरूमच्या उद्घाटनानिमित्त ग्राहकांसाठी चांदीच्या दागिन्यांच्या खरेदीवर फ्लॅट २५ टक्के विशेष सवलतीची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे पुणेकर ग्राहकांना आकर्षक सिल्वर ज्वेलरी खरेदीची विशेष संधी उपलब्ध झाली आहे.
गौमातेच्या शुभ आशीर्वादाने आणि ग्राहकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने ‘ईवी – टाइमलेस लग्जरी’च्या पुण्यातील नव्या शोरूमच्या प्रवासाला मंगलमय सुरुवात झाली आहे.
