इनोव्हेक्चर्स आणि नेक्सिओची धोरणात्मक तंत्रज्ञान भागीदारी आणखी भक्कम; पुण्यात ग्लोबल इंजिनिअरिंग सेंटरचा विस्तार

पुणे: अमेरिकेतील ‘इनोव्हेक्चर्स’ आणि ‘नेक्सिओ’ या दोन कंपन्यांनी पुण्यात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत इनोव्हेक्चर्सच्या पुणे येथील ग्लोबल इंजिनिअरिंग सेंटरच्या (GEC) माध्यमातून त्यांच्या धोरणात्मक तंत्रज्ञान भागिदारीच्या पुढील टप्प्याची घोषणा केली आहे. २०२४ मधील तंत्रज्ञान सहभागापासून सुरू झालेला हा प्रवास आता नेक्सिओच्या जागतिक प्राधान्यक्रमांना पाठबळ देणाऱ्या व्यापक अभियांत्रिकी भागिदारीमध्ये विकसित झाला आहे. इनोव्हेक्चर्सची पुणे येथील तज्ज्ञ टीम सध्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, एआय, डेटा, क्वालिटी इंजिनिअरिंग आणि आयटी ऑपरेशन्स या क्षेत्रांत नेक्सिओला साहाय्य करत आहे.

पुणे जीईसी हे अमेरिका आणि भारतातील टीम्सना सामायिक उत्पादनाची उद्दिष्टे व इनोव्हेशन उपक्रमांशी जोडण्यासाठी निर्माण केले गेले आहे. याद्वारे नेक्सिओ आपल्या जागतिक प्राधान्यक्रमांशी सुसंगत अभियांत्रिकी क्षमता निर्माण करत असून, यात सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, ऑटोमेशन आणि मॉर्डनायझेशनचा समावेश आहे. यामुळे नेक्सिओला एक स्केलेबल पाया मिळण्यासोबतच अभियांत्रिकी कार्यांमध्ये एआयचा अवलंब करणे सुलभ झाले आहे.

या विस्तारित भागिदारीचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी नेक्सिओचे सीओओ जस्टिन ब्राऊन आणि इंजिनिअरिंगचे व्हाईस प्रेसिडेंट वेई लिउ सध्या भारतभेटीवर आले आहेत.

इनोव्हेक्चर्सचे भारतातील सीईओ गिरीश राव म्हणाले, “नेक्सिओ आणि इनोव्हेक्चर्सच्या संबंधांमागील आमची दृष्टी भारतातील अभियांत्रिकी क्षमता निर्माण करण्याच्या पलीकडची आहे. नेक्सिओसाठी अर्थपूर्ण व्यावसायिक मूल्य देण्यासाठी प्रतिभा, तंत्रज्ञान, डोमेन कौशल्य आणि नाविन्यपूर्णता एकत्रणारी जागतिक अभियांत्रिकी क्षमता आम्ही तयार करत आहोत. गेल्या दोन वर्षांत आम्ही एक मजबूत पाया रचला आहे. पुणे जीईसी या संबंधांच्या पुढील उत्क्रांतीचे प्रतिनिधित्व करते, जे नेक्सिओची उत्पादन व तंत्रज्ञान दृष्टी आणि इनोव्हेक्चर्सचे अभियांत्रिकी कौशल्य, टॅलेंट इकोसिस्टम व डिलिव्हरी क्षमता एकत्र आणते.”

“आमचा असा विश्वास आहे की यशस्वी ग्लोबल इंजिनिअरिंग सेंटर हे केवळ डिलिव्हरी लोकेशनपेक्षा बरेच काही बनले पाहिजे. ते क्लायंटच्या तंत्रज्ञान संस्थेचा एक अविभाज्य भाग बनले पाहिजे, जे त्याच्या उत्पादने, संस्कृती, प्राधान्यक्रम आणि महत्त्वाकांक्षा यांच्याशी सुसंगत असेल. हेच ते मॉडेल आहे जे आम्ही नेक्सिओसोबत तयार करत आहोत आणि पुण्याला नेक्सिओच्या जागतिक अभियांत्रिकी आणि इनोव्हेशन प्रवासाचा एक महत्त्वाचा भाग बनवताना आम्हाला आनंद होत आहे”, असे त्यांनी पुढे सांगितले.

नेक्सिओचे सीओओ जस्टिन ब्राऊन म्हणाले, “इनोव्हेक्चर्ससोबतचे आमचे संबंध नेक्सिओच्या वाढीच्या आणि दीर्घकालीन यशाच्या योजनांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. आम्ही एक बहुवार्षिक भागीदारी तयार केली जी सतत मजबूत आणि विकसित होत आहे, आणि इनोव्हेक्चर्स आमच्या तंत्रज्ञान संस्थेसाठी जे गुणवत्तेचे टॅलेंट आणि क्षमता घेऊन येत आहे, त्याबद्दल आम्ही विशेषतः उत्सुक आहोत. या संबंधांवर आधारित पुढे जाण्यास आणि एकत्र वाढीच्या नवीन संधी निर्माण करण्यास आम्ही उत्सुक आहोत.”

नेक्सिओचे व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंजिनिअरिंग वेई लिउ म्हणाले, “जलद एआय प्रगतीच्या या युगात, नवीन संधी, अनिश्चितता आणि आव्हाने आहेत. इनोव्हेक्चर्स त्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी, उदयोन्मुख संधीचे सोने करण्यासाठी आणि नेक्सिओमध्ये सॉफ्टवेअर मूल्य सतत वितरीत करण्यासाठी आमच्यासोबत काम करण्यास सक्षम आहे. त्यांच्या क्षमतांमुळे आम्हाला सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्या पलीकडे जाऊन आमच्या तंत्रज्ञान ऑपरेशन्सच्या व्यापक क्षेत्रांमध्ये एआयचा वापर वाढवता येतो.”

थोडक्यात, या विस्तारित भागीदारीमुळे नेक्सिओच्या जागतिक तंत्रज्ञान संस्थेला पाठबळ देणारे एक प्रमुख धोरणात्मक केंद्र म्हणून पुण्याची भूमिका अधिक मजबूत झाली आहे.

महाराष्ट्र रिपोर्टर बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button