पोकारी स्वेटतर्फे पुण्यात ‘हायड्रेशन फॉर सिटी हिरोज’ मोहीमेचा शुभारंभ वाहतूक पोलिसांना ३,००० हून अधिक बाटल्यांचे वाटप

पुणे, महाराष्ट्र: आयन सप्लाय ड्रिंकसाठी जागतिक स्तरावर नावाजलेल्या ‘पोकारी स्वेट’ या कंपनीने पुण्यात ‘हायड्रेशन फॉर सिटी हिरोज’ या मोहिमेचा शुभारंभ केला आहे. ही मोहीम पुणे कॅम्पमधील साधू वासवानी रोडवरील ‘डीसीपी ट्रॅफिक ऑफिस, पुणे – २’ येथे पाणी आणि क्षार पुरवठा मोहिमच्या (हायड्रेशन ड्राईव्ह) माध्यमातून राबवण्यात येणार आहे. या उपक्रमात ४० हून अधिक वाहतूक पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. शहराला गतीमान ठेवण्यासाठी सध्याच्या कडक उन्हातही न थकता काम करणाऱ्या या पोलिसांच्या कष्टाची दखल घेणे आणि त्यांच्या शरीरातील पाण्याची पातळी टिकवण्यासाठी त्यांना सहकार्य करणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
पुणे शहर हे आता कडक उन्हाळा आणि दुचाकींचे शहर म्हणून ओळखले जाते. यामुळे उष्णतेचा त्रास आणि निर्जलीकरणासारखी आव्हाने पुण्यात प्रकर्षाने जाणवतात. अनेक पुणेकर थेट उन्हात प्रवास करतात आणि वाहतूक पोलीस कर्मचारी अशा अतिशय विषम हवामानातही वाहनांच्या गर्दीच्या व्यवस्थापनाची जबाबदारी चोख पार पाडत असतात. त्यामुळे या मोहिमेची सुरुवात करण्यासाठी पुणे हे एका अर्थाने योग्य शहर ठरले आहे.
‘हायड्रेशन फॉर सिटी हिरोज’ या मोहिमेच्या माध्यमातून ‘पोकारी स्वेट’चे उद्दिष्ट हे विशेषतः कोरड्या तसेच उष्ण परिस्थितीत निर्जलीकरणासारख्या दुर्लक्षित राहणाऱ्या जोखमींबद्दल जागरूकता निर्माण करणे, हे आहे. विशेषतः उन्हात काम करणाऱ्या व्यावसायिकांना दीर्घकाळ उष्णतेचा आणि शारीरिक श्रमाचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांच्यासाठी शरीरातील पाण्याची पातळी टिकवणे ही केवळ एक निवड नसून ती एक दैनंदिन गरज आहे, हा महत्वाचा संदेश हा उपक्रम या मोहिमेतून अधोरेखित करण्यात येत आहे.
वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांच्या या कठीण आणि अतिशय आव्हानात्मक सेवेदरम्यान शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यास मदत करण्यासाठी पोकारी स्वेटतर्फे या मोहिमेदरम्यान ३,००० पेक्षा अधिक बाटल्यांचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम नागरी कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. परंतु त्याचबरोबर या कर्मचाऱ्यांची चिकाटी, बांधिलकी आणि सार्वजनिक सुरक्षा तसेच शहराचे कामकाज सुरळीत ठेवण्याप्रती ते बजावत असलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा सन्मानही या मोहिमेतून करण्यात आला आहे.
पोकारी स्वेटच्या प्रवक्ते या मोहिमेबद्दल अधिक माहिती देताना म्हणाले की, ‘हायड्रेशन फॉर सिटी हिरोज’ या मोहिमेच्या माध्यमातून आम्हाला केवळ संदेश देणे एवढेच उद्दीष्ट नसून प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन खराखुरा प्रभाव निर्माण करणे, हा आहे. वाढते तापमान आणि उन्हाचा अधिक संपर्क यामुळे या उपक्रमाचा शुभारंभ करण्यासाठी पुणे शहर ही स्वाभाविक निवड ठरली. वाहतूक पोलीस कर्मचारी हे तीव्र उष्णता आणि निर्जलीकरणसारख्या परिणामांना सर्वाधिक सामोरे जाणाऱ्या घटकांपैकी एक आहेत. त्यांच्या आरोग्याला पाठबळ देण्याबरोबरच व्यापक जनजागृती करण्याचा आमच्या प्रयत्नाचा एक भाग आहे. शरीरात पाण्याची पुरेशी पातळी राखणे, हे दैनंदिन आरोग्यातील मूलभूत घटक आहे, हा पोकारी स्वेटचा ठाम विश्वास आहे आणि अशा उपक्रमांद्वारे लोकांना शरीरात पाण्याची पुरेशी पातळी राखण्याच्या अधिक चांगल्या सवयी अंगीकारण्यास प्रोत्साहन मि‌ळेल, अशी आम्हाला आशा आहे.
मूळचे जपानमध्ये विकसित केलेले ‘पोकारी स्वेट’ हे शास्त्रीय पद्धतीने तयार केलेले, कार्बन-रहित हायड्रेशन पेय आहे. घामावाटे शरीरातून बाहेर पडलेले द्रव पदार्थ आणि आवश्यक आयन्स (क्षार) पुन्हा भरून काढण्यासाठी, हे पेय तयार करण्यात आलेले आहे. आपल्या सौम्य चवीसाठी आणि शरीरात वेगाने शोषले जाण्यासाठी ओळखले जाणारे हे पेय, केवळ तहानच भागवत नाही, तर शरीरातील नैसर्गिक आयन संतुलन टिकवून ठेवण्यास मदत करते. हा ब्रँड ‘स्मार्ट हायड्रेशन’ संकल्पनेचा प्रचार करतो. तो विशेषतः आव्हानात्मक वातावरणात शरीरातील द्रव पदार्थ कार्यक्षम राहण्यास आणि त्यांची सातत्यपूर्ण पूर्तता करण्याचे काम करतो.
भारतामध्ये, ‘पोकारी स्वेट’ विज्ञानावर आधारित हायड्रेशन या मुद्दाबाबत सतत जनजागृती करत आहे. आरोग्य, निरामय जीवन आणि सातत्यपूर्ण कामगिरीसाठी स्वतःला एक ‘दैनंदिन हायड्रेशन पार्टनर’ म्हणून कंपनीने स्वत:ची आगळीवेगळी ओळख प्रस्थापित केली आहे. ‘हायड्रेशन फॉर सिटी हिरोज’ सारख्या उपक्रमांचा उद्देश ब्रँडची प्रत्यक्ष जीवनातील उपयुक्तता सिद्ध करणे आणि समाजाशी अधिक दृढ नाते निर्माण करणे हा आहे.
डीसीपी वाहतूक कार्यालयाच्या प्रतिनिधी म्हणाले, “आमचे वाहतूक पोलीस कर्मचारी शहराची वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी रस्त्यावर तासनतास उभे असतात, अनेकदा त्यांना भीषण उष्णतेचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत शरीरातील पाण्याची पातळी टिकवणे हे केवळ त्यांच्या आरोग्यासाठीच नाही, तर सेवेवर असताना त्यांची सतर्कता आणि कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी देखील अत्यंत महत्त्वाचे आहे. आम्ही पोकारी स्वेटच्या ‘हायड्रेशन फॉर सिटी हिरोज’ या उपक्रमांचे कौतुक करतो. हा उपक्रम केवळ लोकांमध्ये प्रत्यक्ष काम करणाऱ्या आमच्या टीमला पाठबळच देत नाहीत, तर सर्वसामान्यांमध्ये हायड्रेशनच्या महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण करण्यास देखील मदत करतो.”

निर्जलीकरणाचा धोका असतानाही जे लोक सक्रियपणे काम करत असतात, त्यांना पाठबळ देण्यासाठी आम्ही अशा प्रकारचे उपक्रम राबवणे सुरूच ठेवू.

पोकारी स्वेट बद्दल
पोकारी स्वेट हा जपानमध्ये विकसित करण्यात आलेला, जागतिक स्तरावर विश्वासार्ह ION Supply Drink आहे. घामाद्वारे शरीरातून कमी होणारे द्रव आणि आवश्यक आयन्स पुन्हा भरून काढण्यासाठी तो तयार करण्यात आला आहे. हा नॉन-कार्बोनेटेड पेय असून चवीला हलका आहे आणि शरीरात लवकर शोषला जातो.
हा ब्रँड ‘स्मार्ट हायड्रेशन’चा पुरस्कार करतो आणि प्रभावी हायड्रेशनद्वारे आरोग्य, तंदुरुस्ती आणि दीर्घकाळ टिकणारी कार्यक्षमता यांना प्रोत्साहन देण्यासाठी कटिबद्ध आहे.

महाराष्ट्र रिपोर्टर बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button